ध्यानदृष्टीद्वारे पू. शुकदास महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येते!


स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती यांचे प्रतिपादन,संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आजपासून संगीतमय श्रीराम कथा

कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी शरीर त्यागले असले तरीध्यानदृष्टीद्वारे अंतरंगात त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येतेअसे प्रतिपादन श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंदजी सरस्वती महाराज यांनी केले. आज महाराज शरीररुपाने नसले तरीत्यांचे आत्मरुप महाचैतन्य विवेकानंद आश्रमाद्वारे जीवांच्या सेवेचे कार्य करतच राहीलअसा आशावादही स्वामीजींनी व्यक्त केला. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या समाधीस्थ महानिर्वाणास रामनवमी रोजी वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्त विवेकानंद आश्रमाच्या वतीने चार दिवशीय संजीवन समाधी सोहळा आयोजित केला असूनया सोहळ्याची सुरुवात आज दिनांक २२ मार्च रोजी स्वामी हरिचैतन्यानंदजी सरस्वती यांच्या संगीतमय श्रीरामकथेने होत आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बुधवार(दि.२१) रोजी ते बोलत होते. सोहळा काळात महाराजश्रींच्या समाधीचे दररोज मंत्रोपच्चारात पूजन होणार असूनराज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी समाधी दर्शन खुले राहणार आहे.

पुढे बोलतांना स्वामी हरिचैतन्यानंदजी म्हणालेत्यांच्याशी माझा आध्यात्मिक व स्नेहाच्या पातळीवर संबंध आला. एकमेकांशी संवाद साधताना त्यांना दुःखीपीडितांच्या सेवेचीच काळजी असायची. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी देह अक्षरशः चंदनासारखा झिजविला. अध्यात्मिक पातळीवर अत्युच्च शिखरावर पोहोचलेले ते महान संत होते. आज ते शरीररुपाने नसले तरी विवेकानंद आश्रमाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन ते आपले कार्य करूनच घेत राहतीलअसेही स्वामी हरिचैतन्यानंदजी सरस्वती म्हणाले.

संपन्न होणारे कार्यक्रम
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज समाधी सोहळयानिमित्त दि.२२ ते २४ मार्च पर्यंत दुपारी १ ते ५ वाजे पर्यंत स्वामी हरिचैतन्यानंदजी यांची संगीतमय श्रीरामकथा पार पडणार असूनरामनवमी रोजी सकाळी ११ ते ३ दरम्यान हा कथा सोहळा होईल. या शिवाय चारही दिवस राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचेही रात्री ८ ते १० वाजे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पैठण येथील हभप. बाजीराव महाराज जवळेकरपंढरपूर येथील प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर व हभप. गोविंद महाराज चौधरी आणि वेदांताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री या कीर्तनकारांचा समावेश आहे. या शिवायदररोज सकाळ व संध्याकाळी प्रार्थनाआरतीअनुभूती चिंतन यांचेही आयोजन करण्यात आलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा