Responsive Ads Here

गुरुवार, १ मार्च, २०१८

विवेकानंद आश्रमात होळी निमित्त वृक्ष पूजनाचा संदेश


 विवेकानंद आश्रमात दरवर्षी होळी सण वृक्ष पूजन करून साजरा करण्याची परंपरा गत अनेक वर्षापासून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी घालून दिली आहे. वृक्षांचे संवर्धन व्हावेनिसर्गाचेपर्यावरणाचे रक्षण व्हावे. भावी पिढीने वृक्ष वेलींचा नाश न करतात्यांना हानी न पोहचवता त्यांचे पूजन करून त्यांना आपलेसे करावे हि भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी दरवर्षी प्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या सणानिमित्त  गुरूवारी (दि.१) रोजी वृक्ष पूजनाचा कार्यक्रम विवेकानंद आश्रमात आयोजित करण्यात आला होता.
सकाळी दहा वाजता कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्रींच्या निवसस्थानाजवळ लागून असलेल्या बकुळ वृक्षाचे प्रातिनिधीक  स्वरुपात पूजन करण्यात आले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष कालवे होतेतर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त तथा मार्गदर्शक दादासाहेब मानघाले,आश्रमाचे उपाध्यक्ष्य अशोक थोरहाते,प्राचार्य अनुप शेवाळे,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,विश्वस्त पुरुषोत्तम आकोटकर तथा आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात वृक्ष पूजन करून करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी निसर्गाचे जतन व्हावे व पाण्याचा काटकासरीने वापर व्हावा या संबधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सावरकर यांनी मार्गदर्शन केले. रंग पंचमी साजरी करतांना कृत्रिम रंगाचा वापर न करता पर्यावरण पूरक व सभ्यतेने रंगपंचमी साजरी करावी असे आवाहन ही त्यांनी केले. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रीं हा परिसर नानाविध वृक्षएवेलींनी नटवला असून मनाला आल्हाददायक वाटणारा व शांती देणारा आहे. मानवी जीवन विविध रंगानी नटलेले आहे. जीवन हे सुंदर असून जगण्यास अर्थ प्राप्त करावा यासाठी ज्ञानार्जन करावे. व्यसनांना दूर ठेऊन जीवन सार्थकी लावावे असे आवाहन आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेऊन आभार प्रदर्शन  करून कार्यक्रमाची सांगता झाली.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा