Responsive Ads Here

गुरुवार, १५ मार्च, २०१८

संजीवन समाधी सोहळ्या निमित्त निघणार संपर्कयात्रा


कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विवेकानंद आश्रमाच्या वतीने संपर्कयात्रा काढण्यात येणार आहे. दोनशे गावांतून ही संपर्कयात्रा फिरणार असून  वेदांताचार्य, रामायणाचार्य ह.भ.प. गजाननदादा शास्त्री हे संपर्कयात्रेचे नेतृत्व करणार आहे.
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन महानिर्वाणास येत्या रामनवमी दि.२५ मार्च रोजी वर्षपूर्ती होत आहे.


 यानिमित्त चार दिवशीय संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सहभाग वाढावागावोगावी स्वामी शुकदास महाराज प्रार्थना मंडळे स्थापन करावीतअसा निर्णय नुकत्याच झालेल्या विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळ बैठकीत झाला होता. त्या अनुषंगाने वेदांताचार्य,रामायणाचार्य ह.भ.प. गजाननदादा शास्त्री यांच्या नेतृत्वात आठवडाभराची संपर्कयात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा गावोगावी जावून शुकदास महाराजांचे जीवित व आध्यात्मिक कार्यविवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्याची माहितीया सेवाकार्यात लोकसहभाग वाढविणे याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेचगावोगावी प्रार्थना मंडळे नियुक्त करून त्यांना शुकदास महाराज लिखित अनुभूती ग्रंथबोधवचने ग्रंथछायाचित्र आणि इतर साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या संपर्कयात्रेत आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहातेसहसचिव आत्मानंद थोरहातेविश्वस्त पुरुषोत्तम अकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,तलाठी राजेंद्र आव्हाळेमाजी उपसभापती बबनराव लहानेकार्यकर्ते गंगाधर निकसह.भ.प. निवृत्तीनाथ येवले शास्त्रीह.भ.प. विष्णू थुट्टे शास्त्रीशिवदास सांबापुरेवसंतअप्पा सांबापुरेसंजय भारतीएकनाथ आव्हाळेमोतीराम थोरहाते यांचा सहभाग असणार आहेअशी माहितीही सचिव संतोष गोरे यांनी दिली.

समाधी सोहळा महाप्रसाद लोकसहभागातून
कर्मयोगी प.पू. शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चार दिवस राज्यभरातून येणा-या भाविक-भक्तांना अन्नदान केले जाणार आहे. तसेच महाप्रसादाचेही वाटप होणार आहे. या अन्नदानात लोकसहभाग असावाअशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. त्यासाठीचा अन्नदानाचा खर्च उचलण्यासाठी काही भाविकांचेअन्नदात्यांचे गटही पुढे आले आहे.

प्रार्थना मंडळाची स्थापना
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजांच्या विचारकार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणेनागरिकांचा आश्रमाच्या सेवा कार्यात सहभाग वाढविणे आणि गावोगावी स्वामी शुकदास महाराज प्रार्थना मंडळे स्थापन करणे आदी उपक्रम या यात्रेदरम्यान राबविले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा