मेहकर येथील जेष्ठ नागरिक संघ व डॉ.प्रशांत दिवठाणे यांनी जेष्ठांना प्रोजेक्टरद्वारे काचबिंदू बाबत मोफत मार्गदर्शन केले. जवळपास २०० नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.त्यांचा हा सामाजिक उपक्रम जेष्ठांसाठी फायदेशीर ठरणारा आहे.
आँखें भी होती है दिल की जुबां...बिन बोले कर देती है हालात यह पल में बयां... डोळे ही मनुष्याला देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे. या डोळयाव्दारे व्यक्ती हा वृक्षवेली,नदया,पर्वत व निसर्गाचे विलोभनीय दृश्य मनुष्याला सहज पाहता येते. व्यक्ती परत्वे डोळयातील भाव वेगवेगळे असतात. कधीकधी याच डोळयाव्दारे प्रेम, वात्सल, करूणा तर कधी क्रोध, लोभ, मत्सर व व्देष सुध्दा याच डोळयाव्दारे व्यक्त होतो. माणसाच्या अबोल भावनांना व्यक्त करण्याची किमया केवळ डोळेच करू शकतात. डोळे हे पंचेंद्रियापैकी महत्वाचे एक इंद्रिय आहे. डोळयाला अंधत्व येवू नये म्हणून प्रत्येक जेष्ठांनी डोळयाच्याआरोग्याची योग्य काळजी घ्यावी. वाढत्या वयोमानानुसार जेष्ठांच्या नेत्रविकारास सुरूवात होते.
मेहकर तालुक्यातील जेष्ठ नागरीकांना नेत्रविकाराबाबत माहिती व जनजागृती होण्याच्या दृष्टीने मेहकर येथील नेत्ररोगतज्ञ डॉ.प्रशांत दिवठाणे यांनी जेष्ठांना प्रोजेक्टरव्दारे शुक्रवारी (दि.१६) रोजी राम नेत्रालय फेको अॅन्ड लेझर सेंटर मेहकर मार्गदर्शन केले. यावेळी बालाजी जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मोहरील,उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड,नरेश मिनासे,प्रकाश बावणे,साहेबराव नागरीक,अरविंद वाडकर,अरूण जमादार,अशोक टाकसाळकर,लक्ष्मण मानवतकर,डॉ.विजय जोशी, भगवान खडसान,जगन्नाथ देशपांडे,मुरलीधर मुंदडा,सखाराम नागरीक रतन नागरीक तथा मेहकर तालुक्यातील दोनशे ते अडीश जेष्ठ नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
कुणाला होवू शकतो काचबिंदू
ज्या जेष्ठांचा चष्म्याचा नंबर वारंबार बदलत असेल, वय ४० पेक्षा अधिक असल्यास किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला काचबिंदू असल्यास काचबिंदू होण्याची शक्यता निर्माण होते. याशिवाय ज्या जेष्ठांना डायबेटिस किंवा ब्लडप्रेशन असेल तर काचबिंदू असण्याची शक्यता आहे. यासाठी जेष्ठांनी नियमीत व वेळेवर तपासणी व औषध उपचार न केल्यास कायमची दृष्टी जाण्याची धोका निर्माण होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील २.६ टक्के लोकांना काचबिंदू होतो. भारतात काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराला बळी पडणा-या स्त्रियांची संख्या अधिक आहे. जेष्ठांनी नियमित नेत्रतपासणी केल्यास काचबिंदूचे निदान लवकर होते. डॉ.प्रशांत दिवठाणे,नेत्ररोगतज्ञ मेहकर
ग्रामीण भागातील जेष्ठ नागरीकांच्या सर्वांगिण विकासासाठी जेष्ठ नागरीक संघ सदैव तत्पर असतो. ग्रामीण भागातील जेष्ठांना नेत्रविकाराबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने प्रोजेक्टरव्दारे काचबिंदू वरील मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा