Responsive Ads Here

रविवार, ४ मार्च, २०१८

हिवरा आश्रमात तरुणांनी खेळली कोरडी रंगपंचमी


रंगपंचमीत नैसर्गिक रंगांना दिले प्राधान्य, अनेकांनी टिळा लावून साजरी केली रंगपंचमी

रंगपंचमी आली की रंगबेरंगी रंगाची उधळण...विविध रंगांनी आपल्या स्नेहीजणांना रंगविण्याचा अदभूत अनुभव काही वेगळा...लपत छपत पावलाचा आवाज न होवू देता आपल्या मित्रांना रंगविण्यात काही औरच मज्जा असते... लहानग्या पासून ते जेष्ठा पर्यंत रंगपंचमी आली कि आनंदाला उधान येते. रंगपंचमी हा प्रत्येकाच्या आवडीचा सण आहे. कालपरत्वे रंगपंचमी साजरी करण्याच्या पध्दतीत बदल होत आहे. रंगपंचमीच्या दिवशी ओल्या रंगासाठी पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी व रसायनिक रंगामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणाम रोखण्यासाठी हिवरा आश्रम येथील तरुणांनी कोरडा रंग खेळून रंगपंचमी मोठया प्रमाणात साजरी केल्याचे यावेळी दिसून आले आहे. हिवरा आश्रम परिसरात शुक्रवारी रंगपंचमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त तरूण, तरूणी, स्त्री, पुरूषांनी कोरडा रंग खेळण्यास व  टीळा लावून रंगपंचमी खेळण्याला अधिक पसंती दर्शविली. कोरडा रंग खेळल्यास मोठया प्रमाणात पाण्याची बचती सोबत सामाजिक भान जपत असल्याचे काही तरूणांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. पारंपारीक रंगपंचमी सणाची प्रथा नव्या पिढीने इकोफ्रेंडली  व कोरडी रंगपंचमी साजरी करण्यावर भर देत समाजाला संदेश दिला. यावर्षी सोशल मिडीयावरून रंगपंचमीच्या शुभेच्छा देतांना युवकांनी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले. पर्यावरणाचे भाव ठेवण्याचे आवाहन करणारे संदेश आपल्या मित्र मैत्रींना पाठवत कोरडी रंगपंचमी खेळण्याचे भावनीक आवाहन केले. याचाच परिणाम यावर्षी तरूणांनी मोठया प्रमाणात कोरडे रंग खेळून रंगपंचमी साजरी केली.

रंगपंचमीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश
रंगपंचमीच्या दिवशी पाणीचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी रंगपंचमीला रासायनिक रंगांचा वापर करणे टाळले. अनेकांनी कोरडया रंगांना प्राधान्य देवून तरूणांसह अनेकांनी रंगपंचमी साजरी केली. अनेकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

असे बनविले नैसर्गीक रंग
हळदी व बेसनाच्या पिठापासून पिळा रंग बनविला तर पालक, कोथींबीर या पालेभाज्यापासून हिरवा रंग तयार केला. गुलाबी रंगासाठी बिटाचा वापर केला. याशिवाय डाळींबाच्या सालीपासून नारंगी तर आवळयाच्या पुडापासून काळा रंग तयार केला.

रासायनिक रंगामध्ये घातक केमिकल्स असल्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या रंगामुळे अनेकांना त्वचाविकारासोबत डोळयाला सुध्दा नुकसान पोहचते. रंगामुळे त्वचेची आग होणे, डोळयांची जळजळ होते. याउलट नैसर्गीक रंगांनी शरीराला कुठलाही अपाय होत नाही.
                                                            पियुष भारती हिवरा आश्रम


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा