स्वामी हरिचैतन्य सरस्वती यांच्या श्रीरामकथेचे आयोजन, राज्यभरातून हजारो भाविकांची लाभणार उपस्थिती
दीड कोटी रुग्णांना व्याधीमुक्त करणारे कुशल धन्वंतरी तथा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष, कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधीला येत्या रामनवमी सोमवार दि.२५ रोजी वर्षपूर्ती होत आहे. कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी रामनवमीच्या दिवशी समाधीस्थ महानिर्वाण केले होते. या समाधी सोहळ्या निमित्त २२ ते २५ मार्चदरम्यान संगीतमय श्रीराम कथा व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीराम कथा ऐकण्याचे सद्भाग्य लाखो भाविकांना प्राप्त होणार आहे. तर दररोज रात्री ८ ते १० वाजेदरम्यान राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविक या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरणाने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे.
तर शेवटच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ वाजे दरम्यान यावेळेत श्रीरामकथा पार पडेल. तसेच, दिनांक २२ मार्च रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प. बाजीराव महाराज जवळेकर पैठण,दिनांक २३ मार्च रोजी ह.भ.प. प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर पंढरपूर, दिनांक २४ मार्च रोजी ह.भ.प. गोविंद महाराज चौधरी पंढरपूर यांचे तर दिनांक २५ मार्च रोजी दुपारी साडेचार ते सहा वाजेदरम्यान वेदांताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री जालना आणि रात्री ८ ते १० दरम्यान ह.भ.प. अशोक महाराज जाधव पुणे यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. रामनवमीला मुख्य संजीवन समाधी सोहळा पार पडणार असून, यानिमित्त पूज्यनीय महाराजश्रींच्या समाधीस्थळी विविध धार्मिक विधी व पूजन पार पडणार आहे. तसेच, राज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी समाधीस्थळ दर्शनासाठी खुले असणार आहे. मुख्य पूजाविधीनंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान भाविक-भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. संगीतमय श्रीराम कथा व संजीवन समाधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण राज्यासह देश-विदेशातील भाविकांना ऑनलाईन पाहाता येणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत यांनी दिली आहे.
सोहळा सोशल मीडियावर ऑनलाईन
संगीतमय श्रीराम कथा व संजीवन समाधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण राज्यासह देश-विदेशातील भाविकांना ऑनलाईन पाहाता येणार आहे. विवेकानंद आश्रम युट्यूब चॅनलवर हा सोहळा दिनांक 22 मार्चपासून पाहता येईल. याच सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण विवेकानंद आश्रमाच्या फेसबुक पेजसह ट्वीटरवरदेखील केले जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन विवेकानंद आश्रमाच्या आयटी टीमद्वारे करण्यात आले होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या अलंकापुरी आळंदीत त्यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत असतो. त्यानंतर महाराष्ट्रात साजरा होणारा कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा हा दुसरा सोहळा ठरणार आहे. युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना जीवनध्येय माणून पू. शुकदास महाराजांनी कोट्यवधी दीन,दलित, उपेक्षितांच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित केले.

आर. बी. मालपाणी, अध्यक्ष विवेकानंद आश्रम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा