Responsive Ads Here

सोमवार, २६ मार्च, २०१८

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळयाची सांगता


राज्याच्या कानाकोप-यातून हजारो भाविकांची उपस्थिती

जीवंत देवाची उपासना हीच खरी उपासना आहे. रंजल्या गांजल्या,दीन दुःखीतांच्या जीवनातील अज्ञान,दुख दुर करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळयाची सांगता हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण करून  रविवारी (दि.२५ ) करण्यात आली. सकाळी सात वाजता प्रभू श्रीराम व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेची फुलांनी सजविलेली पालखी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त नारायण भारस्कर,दयानंद थोरहाते यांनी आपल्या खांदयावर घेवून विवेकानंद नगर ग्राम फेरीस प्रारंभ झाला. यावेळी पालखी सोहळयामध्ये पंचक्रोशीतील दिंडया सहभागी झाल्या होत्या. टाळ,मृदंगाच्या सुमधूर निनाद.... जय ब्रम्हरूपा...जय ब्रम्हरूपा... च्या घोषाने यावेळी आसमंत निनादून गेला.या पालखी सोहळयात हजारो स्त्री पुरूष उत्साहाने सहभागी झाले होते. विवेकानंद नगरीत कर्मयोगी संत शुकदास महाराज व प्रभू श्रीराम पालखीचे सुवाशिनीनी पुजन व दर्शन घेतले.यावेळी प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. सकाळी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधीचा विधीवत वेदमंत्रोच्चारात अभिषेक,पुजन व आरती करण्यात आली. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत श्रीश्रीश्री १०००८  स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज  यांची सुश्राव्य संगीत श्रीराम कथा संपन्न झाली. श्रीराम कथा श्रवनासाठी यावेळी राज्यभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी ३ ते ६ वाजता महाप्रसादाचे वितरण मुंबई येथील उदयोजक एकनाथ दुधे,भारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वस्त्रउदयोग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर,अमरावजीचे उपजिल्हाधिकारी आर.डी.काळे, भाजपाच्या जेष्ठ नेत्या श्रीमती मंदाकिनी कंकाळ,भाजपाचे जेष्ठ नेते सुरेशआप्पा खबुतरे, हभप प्रकाशबुवा जवंजाळ तथा आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हजारो भाविकांना महाप्रसाद वितरणाने कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधीसोहळयाची सांगता करण्यात आली. गतवर्षी श्रीरामनवमी पर्वावर कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री समाधीस्त झाले होते वर्षपूर्तीनिमित्ताने श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून रविवारी (दि.२५ मार्च) रोजी कथेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या हजारो उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.संध्याकाळी ६  ते  वेदांताचार्य हभप गजाननदादा शास्त्री महाराज यांचे प्रवचन तर रात्री ८ ते १० पुणे येथील सुप्रसिध्द कीर्तनकार हभप अशोक महाराज जाधव यांचे कीर्तन संपन्न झाले. या  सोहळयाच्या यशस्वीतेसाठी आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये,अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,कैलास भिसडे,अशोक गि-हे,अ‍ॅड किशोर धोंडगे,प्राचार्य डॉ.सुभाष कालवेअनुप शेवाळे,पंढरीनाथ शेळके,हभप निवृत्तीनाथ येवले महाराज,हभप विष्णु थुट्टे महाराजे,प्रा.मधुकर आढाव,कार्यकर्ते शिवदास सांबपूरे,संजय भारती,गंगाधर निकस,राजेद्र आव्हाळे,अनंत जवजाळ,एकनाथ सास्ते,प्रमोद सावरकर,विवेक दळवी तथा आश्रमाचे कार्यकर्ते,भाविक भक्त इत्यादीनंी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा