हरीत क्रांतीनंतर शेती क्षेत्रात झपाटयाने बदल होत गेले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्याकडे बळीराजाचा मोठया प्रमाणात कल वाढला. यंत्रयुगात शेतीची सर्व कामे यंत्राच्या मदतीने होत असल्यामुळे शेतकरी बांधवांची बैलजोडी व पशूपालनाकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम पोळा सणावर दिसून आला. मात्र विवेकानंद आश्रम गेल्या पन्नास वर्षापासून यंत्रयुगातही पोळयाची परंपरा जोपासत आहे. आश्रमाच्या पोळा उत्सवात शेतक-यांच्या पाच उत्कृष्ट बैलजोडींना बक्षीसे दिल्या जातात. बळीराजाच्या सुख दुःखात,रखरखत्या उन्हामध्ये राबणारा त्याचा जिवलग...हिवाळयात पावसाळयात प्रत्येक क्षणाला त्याला सावली प्रमाणे सोबती असलेल्या बैलाप्रती असलेली आपुलकी,आदराचे दर्शन घडविणारा सण म्हणजे पोळा. सर्वप्रथम आश्रमाच्या वतीने बैलांचे व शेतक-यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सुदृढ व सजविलेल्या बैलांचे परिक्षण करून त्यांना अनुक्रम पाच बक्षिसे देण्यात आली.शेतकरी बांधवांच्या उत्कृष्ट बैलजोडींची निवड करून त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याची विवेकानंद आश्रमाची परंपरा आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय परमेश्वर वडतकर, विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, पुरूषोत्तम आकोटकर, नारायण भारस्कर,प्राचार्य अणाजी सिरसाट,प्राचार्य मधु आढाव,एकनाथ आव्हाळे,डॉ.सुनिल देशमाने,पत्रकार समाधान म्हस्के,संतोषबापू थोरहाते,सदाशिव काळे,सरपंच पती मुंगशीदेव डाखोरे,उपसरपंच मधुकर शेळके,विठ्ठल भाकडे,माजी सरपंच अशोक लहाने,माजी सरपंच मनोहर गि-हे,कृ.उ.बा.संचालक दामुअण्णा गारोळे, माजी कृषी अधिकारी दत्तात्रय लहाने,पो.पा.विवेक लहाने,रविप्रकाश घोंगडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी तर आभार सचिव संतोष गोरे यांनी मानले.
उत्कृष्ट बैलजोडींना बक्षिसे
यावर्षी विवेकानंद आश्रमात भरलेल्या पोळयामध्ये उत्कृष्ट बैलजोडी म्हणून प्रथम येण्याचा मान शेतकरी शेरू शहा वजीर शहा,व्दितीय विश्वास रायते,तृतीय वैजीनाथ दळवी,चतुर्थ जगन्नाथ गिèहे तर पाचवा क्रमांक राजू लोखंडे यांच्या बैलजोडीला मिळाला आहे. विवेकानंद आश्रम दरवर्षी बळीराजाच्या उत्कृष्ट पाच बैलजोडीला उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याची पन्नास वर्षाची परंपरा आजही जपत आहे.
विवेकानंद आश्रमाची पन्नास वर्षाची परंपरा
दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात पोळयाचे मोठया प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद आश्रमात गेल्या पन्नास वर्षापासून पोळा मोठया थाटा माटात साजरा करण्यात येतो. पोळयासाठी परिसरातील शेतक-यांनी आपले बैल रंगरंगोटी करून,सजवून थाटामाटात मिरवणूकीने आश्रमात आणले. पोळयाला सर्जा राजाला सजवून शेतक-यांनी विवेकानंद आश्रमात सायंकाळी पाच वाजता आणले होते. या पोळयासाठी जवळपास चाळीस ते पन्नास बैलजोडी बळीराजाने सजवून विवेकानंद आश्रमात आणले होते.
संतोष उपाख्य बापुश्री थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा