दीपक ः बाबा 86 रूपये पेट्रोल आहे
तर 200 रु. पेट्रोल टाकून आणू का?
बाबा ः अबे आता काय वावर विकायला
लावतो का? 86 रुपये पेट्रोल टाकून आणून मुकाट्याने 10 रुपयाचे पेट्रोल
टाक अन् गाडी पेटवून दे
एसटीने वापस ये!
आजकाल तरूणाईला दुचाकी चालविणे आर्कषण
वाढले आहे सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरीही वडील मुलांच्या हौसेपोटी
त्यांना
महागड्या मोटार सायकली घेऊन देतात.
पेट्रोल दराचा विचार केला जात नाही या संदर्भातील बाप लेकाचा अतिशय हास्यपद असून
देखील
दुसरीकडे मात्र तमाम भारतीयांना विचार
करायला लावणारा आहे. हे अतिशय महत्वाचे आहे. विविध प्रकारच्या हास्यप्रकारच्या
संवादातून
बापलेकांनी सध्याच्या परिस्थितीची
जाणीव करून दिली आहे. सोशल मिडीया व्हायरल झालेला व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय झाला
असून सर्व
समाजातील तमाम नागरिकांकडून उत्तम
प्रतिसाद मिळत आहे. यातच बाप लेकांच्या संवादातील यश संपादित झाले असे म्हटल्यास
वावगे ठरणार
नाही. दिपक पाटील हा अतिशय गुणी
कलाकार असून त्याला समाजातील वास्तवात घडणार्या घटनांवर आधारित प्रासंगिक विनोद
करण्याची
आवड त्यांच्या अंगी आहे संवादाबरोबर
तो उत्कृष्ट अभिनय करू शकतो. म्हणून कुठलेही मार्मिक संवाद हे प्रत्येक व्यक्तीला
विचार करणारे
असतात. त्यातून तो एक सामाजिक
बांधिलकी नात्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो. सोशल मिडीयाचा बाबतीत
समाजामध्ये
समज गैरसमज मोठ्या प्रमाणावर लोकांना
माहित असले तरी देखील मिडियाचा विधायक कार्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे
बापलेकांच्या
संवादातून स्पष्ट दिसून येते.
त्यामुळे हा व्हिडीओ कळत ना कळत सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकप्रिय शिखरावर जाऊन
पोहचला आहे.
दिपक पाटील हा मुळचा जळगाव जिल्हयातील
सावदा या गावातील रहिवाशी असून त्याला लहानपणापासून नकला व अभियनाची आवड असून
तो विविध एकांकिका नाट्यस्पर्धेत
भूमिका गाजविल्या आहेत. खेड्यागावातील हा कलाकार असल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे
फारसे साधन
उपलब्ध नाही अशा परिस्थितीत बदलत्या
काळानुसार अनेक उदयोमुख कलाकारांना विविध चॅनलवरील मालिका, रंगभूमीवरील नवीन
नाट्यकृती, आगामी नवीन हिंदी
चित्रपट या सारख्या माध्यमातून अनेक नामवंत दिग्दर्शक व निर्माते संधी देत असतात.
त्यामुळे दिपकला
नाट्य अभिनय कला क्षेत्रात लवकरात
लवकर संधी मिळावी त्यासाठी अनेक निर्मात्यांनी त्याला मोलाचे सहकार्य करावे आणि
कलागुणांना
प्रोत्साहन मिळावे आणि त्याची अभिनय
संपदा भविष्यात बहरत जावी अशी तमाम रंगकर्मी व प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
लेखिका
पूजा बागुल
नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा