अमृता पाध्येला आर्किटेक्ट मध्ये गोल्ड मेडल



जब टूटने लगे हौंसला तो बस ये याद रखना...बिना मेहनत के हासिल तख्त  ताज नही होते...ढूढ लेना अंधरे मे ही मंजिल अपनी दोस्तो...क्योंकीजुगनू कभी रोशनी के मोहताज नही होते...यश मिळविण्यासाठी फक्त स्वप्ने पुरेशी नाही तर स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी अथक परिश्रमअभ्यासातीलसातत्य,नियोजन,परिश्रमाची पराकाष्टा करण्याची तयारी आवश्यक असते याचाच प्रत्यय  येथील अमृता अशोक पाध्ये हीने  मिळविलेल्या गोल्ड मेडलच्या रूपानेदिसून आलाविशेष बाब म्हणजे अमृता पाध्ये हीचा एसजीपीए पॉईंटर १०.०० एवढा आहेअमृता  ही अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तीने आपले अंतीम वर्षाचे सराव अध्ययन नाशीक येथील सुप्रसिध्द वास्तुविशारद संजयपाटील  यांच्याकडे पूर्ण केले आहेतीने यापूर्वी दरवर्षीच प्रथम येण्याचा मान मिळवला आहेअमृता पाध्ये ही प्रतिथयश अभियंता  बिल्डर अशोक पाध्ये वसौ.स्वप्ना पाध्ये यांची मुलगी आहे.

सुवर्ण पदकासह विद्यापीठातून प्रथम
अमृता अशोक पाध्ये या विद्यार्थीनीने बी.आर्किटेक्चरच्या अंतिम वर्षी सुवर्ण पदकासह विद्यापीठात प्रथम येण्याचा मान राखलानुकताच अमरावतीविद्यापीठाचा बीआर्किटेक्चरचा अंतिम वर्षाचा निकाल घोषीत करण्यात आला असून यामध्ये अकोला येथील विद्यार्थी अमृता अशोक पाध्ये हीने ५०० गुणापैकी४४० गुण मिळवत सुवर्ण पदकासह विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

अनाथ मुलांच्या निवासी शाळा बांधकाम  सुविधा प्रकल्प
अमृता पाध्ये हीने अनाथ मुलांच्या निवासी शाळेच्या इमारतीचे अध्ययन केलेमहाराष्ट्रातील अनाथ मुलांच्या निवासी शाळेला भेटी देवून त्याचे सखोल अध्ययनकेले.अनाथ मुलांच्या निवासी शाळांचा शास्त्रशुध्द अभ्यास करून एक प्रकल्प तयार केलाअमृता पाध्ये हीने अनाथ मुलांच्या निवासी शाळा बांधकामाची संरचना वसुविधा या विषयावर पुणेकर्जत  हिवरा आश्रम येथील अनाथ मुलांच्या शाळांचे सखोल निरीक्षण करून आपला  प्रकल्प सादर केला.

ड्रॉर्इंग शीटसाठी वॉटर कलर  रोटरिंगचा वापर
आर्किटेक्चर अभ्यासक्रमात ड्रॉर्इंग शीट काढण्याला खुप महत्व आहे. सर्वसाधारपणे प्रथम वर्षानंतर मुले संगणकाचा वापर करून शीट तयार करतात. परंतुअमृताने सर्व पाचही वर्ष वॉटर कलर व रोटरींग च्या माध्यमातून मॅन्युअल रेंडरींग व लेटरींग  केले. त्यासाठी तीला अथक परिश्रम घ्यावे लागले. अमृताला शिवाजीमहाविद्यालयाचे विभाग प्रमुख दिलीप जडे,गावंडे,नाथे मॅडम,तसेच आर्किटेक्ट उनाटकाट यांचे मार्गदर्शन मिळाले.


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा