कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी सुरू केलेले मानवसेवेचे विविध उपक्रम सर्व जाती,धर्माच्या भल्यासाठी, उत्कर्षासाठी आहे. स्वामी विवेकानंदांचा विश्वबंधूत्वाचा दिव्य विचार प.पू. शुकदास महाराजांनी समाजामध्ये खèया अर्थान रूजविला. विवेकानंद आश्रम ही सर्व जाती,धर्म,पंथाच्या सेवेसाठी झटणारी संस्था आहे. कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी जनसेवेसाठी स्थापन केलेला हा विवेकानंद आश्रम जणू सामाजिक एकात्मतेची पंढरीच आहे असे भावपूर्ण उद्गार जिल्हयाचे नवनिर्वाचित पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी बोलतांना काढले. पोलीस विभागाने विवेकानंद आश्रमात आयोजित केलेला सामाजिक ऐक्य परिषदेत गुरूवारी ते बोलत होते.
ठाणेदार सचिन शिंदे यांचा सत्कार
साखरखेर्डा पोलीस स्टेशनला आएसओ नामंकन मिळाल्याबद्दल पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबल पाटील यांच्या हस्ते ठाणेदार सचिन शिंदे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून यावेळी सत्कार करण्यात आला.
विवेकानंद आश्रम मानवसेवेचे व्यासपीठ
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या अनुभूतीतून जोपासले गेलेले धर्म ऐक्य व सद्यपरिस्थीत आवश्यक असलेले एकात्मतेचा विचार समान आहे. उत्सवांच्या कालावधीत सामाजिक ऐकापा कायम राहण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन करीत असलेले प्रयत्न स्पृहनीय आहेत असे उद्गार हभप गजाननदादा शास्त्री महाराज यांनी काढले.
संतोष श्री. थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा