हिवरा आश्रम येथे आज गायींचे भव्य प्रदर्शन व मेळावा



ना.अर्जुनराव खोतकर,.डॉ.रायमूलकर,हभप गजाननदादा शास्त्री राहणार उपस्थित



विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थावर गोकुळाष्टमी निमित्ताने भव्य गाईचे प्रदर्शन,मोफत आरोग्य तपासणी सुुदृढ गायींसाठी बक्षिसे यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयाला  राज्याचे पशू संवर्धन दुग्ध विकास,मत्स्य वस्त्र उद्योग मंत्री ना.अर्जुनराव खोतकर,मेहकरचे .डॉ.संजय रायमूलकर, पशू संवर्धन सभापती दिनकरराव बापू देशमुख,जालनाचे माजी जि.. अध्यक्ष पंडीतदादा भुतेकर,जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ,समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ खरात यांची उपस्थिती लाभणार आहे.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  नगरचे राष्ट्रीय कीर्तनकार हभप गजाननदादा शास्त्री महाराज,डॉ.पंदेकृवि विद्यापीठाचे कार्यकारणी परिषदेचे सदस्य विनायकसरनाईक,अकोला जिल्हाचे दुध उत्पादन संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी तथा आदी मार्गदर्शक म्हणून लाभणार आहे अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. हरिहरतीर्थावर पार पडणाèया गोपालक मेळाव्यात उपस्थित शेतकरी बांधवांना ना. अर्जुनराव खोतकर मार्गदर्शन करणार आहेत. आज दि. सप्टेंबर रोजी विवेकानंद आश्रमाच्या हरिहरतीर्थावर संपन्न होत असलेले कार्यक्रम खालील प्रमाणे हरिहर तीर्थावर सदृढ गायीचे प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन केलू असून  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे जेष्ट विश्वस्तदादासाहेब मानघाले राहणार आहेत. सकाळी ते नगरचे राष्ट्रीय कीर्तनकार हभप गजानननदादा शास्त्री महाराज यांचे प्रवचन देखील होणार आहे. सकाळी ते ११. ३० हभप बबनराव वाहेकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन, हरिहर तीर्थावर किसान बंधूंचे गायींसहआगमन,सहभाग नांव नोंदणी,प्रदर्शनात सहभागी गायींचे परिक्षण करून मान्यवरांच्या हस्ते  गोपालकांचा सत्कार,बक्षिस वितरण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर  मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी  या सोहळयात जास्तीत जास्त गोपालकांनी आपल्या गायीसह मोठया प्रमाणात उपस्थित राहावे.  असे आवाहन विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अनुप शेवाळे यांनी केले आहे.

सुदृढ गायींना बक्षिस
दुग्ध व्यवसाय हा शेतकरी बंधूसाठी महत्वाचा जोड व्यवसाय आहे. आपल्या गायींची उत्तम प्रकारे निगा काळजी जे शेतकरी बांधव घेतात. अशा शेतकरी बांधवाना प्रोत्साहन मिळावे. हयासाठी विवेकानंद आश्रमातर्फे गायींच्या मेळाव्याचे आयोजन करून सुदृढ निरोगी गायींना बक्षिस देण्यात येते.

असे राहील बक्षिसांचे स्वरूप

गोपालकांच्या मेळाव्यात सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.बक्षिसे खालील प्रमाणे गट संकरीत गायी, गट गावरान गायी या गटातील प्रत्येकी गायींना दिली जातील. प्रथम प्रथम बक्षीस एक पोते  ढेप व पूरक खाद्य,  द्वितीय बक्षीस एक पोते  ढेप व पूरक तृतीय बक्षिसे ७०१,चतुर्थ ५०१, पाचवे ३०१ बक्षिसे देण्यात येईल.



दुग्ध व्यवसाय हा शेतकरी बंधूसाठी महत्वाचा जोड व्यवसाय आहे. आपल्या गायींची उत्तम प्रकारे निगा काळजी जे शेतकरी बांधव घेतात. अशा शेतकरी बांधवाना प्रोत्साहन मिळावे. हयासाठी आश्रमातर्फे गायींच्या मेळाव्याचे आयोजन करून सुदृढ निरोगी गायींना बक्षिस देण्यात येते.                                                                                                                                                              डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषि महाविद्यालय



संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा