Responsive Ads Here

नाश्ता

कांदा  पोहे 

सकाळी घराच्या बाहेर पडण्यापूर्वी नाश्ता केल्याशिवाय पाय घराच्या बाहेर पडत नाही. नाश्ता केवळ चव म्हणून नाहीतर त्यामध्ये पौष्टिकता सुद्धा असावी. कांदा पोहे हा महाराष्ट्रीयन नाश्ता प्रकार खूपच लोकप्रिय आहे. अत्यंत कमी वेळात होणार असल्यामुळे गृहिणी कांदा पोह्याला मोठ्या प्रमाणात प्राध्यान देतात. आज आपण कांदा पोहे कसे बनवायचे हे शिकणार आहोत.

कांदा पोहे बनविण्यासाठी साहित्य

  • २५० ग्रॅम जाड पोहे
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • मोहोरी
  • जिरे
  • हिंग
  • हळद
  • ६ ते ८  कढीपत्ता पाने
  • ३ हिरव्या मिरच्या
  • ४ चमचे तेल
  • चवीपुरते मीठ
  • लहान चमचा साखर
  • लिंबू
  • चिरलेली कोथिंबीर
  • खिसलेले नारळ
कांदा पोहे बनविण्याची कृती:
प्रथम जाड पोहे भिजवून घ्यावेत . त्यानंतर  थोडे मिठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालावी. कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालावेत. थोडे परतून कांदा घालावा. कांदा तपकिरी रंगाचा होईपर्यंत  परतून घ्यावा.
त्यामध्ये  भिजवलेले पोहे घालावेत. पोहे चांगल्याप्रकारे मिक्स करावे. तेल आणि परतलेला कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी. मध्यम आचेवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मिठ घालावे. काही मिनीटे वाफ काढावी.
त्यानंतर  पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा