'सुभाषच्या' मदतीसाठी सरसावले 'माणूसकीचे' हात!




पार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा दुस-यांच्या दुःखात मदतीसाठी सरसावलेले दोन हात हजार हातासारखे असतात. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून  येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कर्मचा-यांनी गरजू व्यक्तीला मदत करून माणूसकीचे दर्शन घडविले.
घरी अठराविश्व दारिद्र,पोटाची खळगी भरण्यासाठी सतत करावी लागणारे कष्ट अशा परिस्थितीत घरातील कर्त्या  पुरूषाची निधनाने सुभाष संपत आंभोरे वर कोसळलेले दुख अशा परिस्थितीत सुभाष संपत आंभोरेच्या मदतीसाठी कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कर्मचारी वृंद  आर्थिक मदतीच्या रूपाने धावून आल्याची घटना दि.१४ सप्टेंबर रोजी दिसून आली..
सुभाष संपत आंभोरे हा विवेकानंद कृषी महाविद्यालयात मजूर म्हणून काम करतो. सुभाषच्या  कष्टाळूपणा प्रामाणिकतेमुळे सुभाष सर्वांच्या आवडीचा आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारा...पडेल ते काम चिकाटीने करण्याचे कसब असल्यामुळे सुभाषवर विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक,कर्मचारीच्या तोंडी सतत सुभाषचे नाव असते. सुभाषचे वडील संपत आंभोरे हे मोलमजूरीची कामे करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असत. संपत आंभोरे यांना दम्याचा त्रास वाढल्याने त्यांची तब्यत खालावली अशातच त्यांचा दि. १२ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. वडीलांच्या अचानक जाण्यामुळे सुभाष एकाएकी पडला यावेळी विवेकानंद कृषी महाविद्यालयांचे कर्मचारी सुभाष आंभोरे च्या दुःखात सहभागी झाले.विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कर्मचा-यांनी वर्गणी करून आर्थिक मदत गोळा केली. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या हस्ते दि.१४ सप्टेंबर रोजी हजाराची मदत देण्यात आली. यावेळी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्रा.गजानन ठाकरे,प्रा.मंगेश जकाते,प्रा.मनोज खोडके,प्रा.समाधान जाधव,प्रा.पवन थोरहाते,प्रा.दिपक निकम,प्रा.आकाश इरतकर,गणेश धोंडगे,प्रताप पाटील,जयेश बदरखे,गजानन हाडे,भारत आंभोरे,समाधान वडतकर,राम धोंडगे यांच्यासह कृषी महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कर्मचारी बांधवांचे प्रेम स्नेह कायम मिळत आहे. मला दुःखाच्या प्रसंगी केलेली आर्थिक मदत कायम लक्षात राहील.
                        सुभाष संपत आंभोरे हिवरा आश्रम

सामाजिक दायित्वाचे दर्शन
विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कर्मचा-यांनी सर्वांनी मिळून निधी गोळा करून सुभाष आंभोरेला आर्थिक मदत केली. कर्मचा-यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेल्या मदतीचे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे.

संतोष उपाख्य बापुश्री थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा