Responsive Ads Here

रविवार, १० मार्च, २०१९

महिला दिनी स्वाती भराड बनल्या पोलीस उपनिरक्षक !


हिंमत न हार कभी, हौसला रख अपनी मेहनत पर.... ये कामयाबी की शिखर भले ही थोडी ऊँची है, अगर जज्बा है पहुचने का तो मिलती है हर हिंमत पर... याचा प्रत्यय नुकताच मेहकर तालुक्यातील देऊळगांव माळी येथील स्वाती सिताराम भराड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली यांच्या रूपाने दिसून येतो.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला (पी.एस.आय.) गवसणी घातली.
  स्वाती भराडा यांचे पती राम मगर हे राज्य राखीव पोलीस दलात पुणे येथे पोलीस कॉस्टेबल पदावर कार्यरत आहे. वडील सिताराम भराड व पती राम मगर यांच्या प्रेरणेमुळेच स्वाती भराड यांना स्पर्धा परिक्षा तयारीची पे्ररणा मिळाली.  कुठल्याही स्पर्धा परिक्षेच्या शिकवणी ग्रामीण भागातील महिला यशाची स्वप्ने साकार करून शकते हे स्वाती भराड यांनी ते स्वाती भराड इतर स्त्रीयांना प्रेरणा दिली आहे. महिलादिनी स्वाती भराड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. स्वाती सिताराम भराड यांनी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयातून बी.एस.सी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले. बी.एस.सी.अ‍ॅग्रीच्या व्दितीय  वर्षाला असतांनाचा त्यांचे देऊळगांव माळी गावातील राम वसंतराव मगर यांच्याशी लग्न झाले.
महिला दिनीच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याचा अत्यंत आनंद होत असून प्रत्येक स्त्रीयांना यशाची स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे. फक्त यशाचा पाठलाग करतांना मेहनतीची,जिद्दीची किंमत  मोजावी लागते. यशाची स्वप्नपूर्ण करतांना अनेक अडचणी आल्यातरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. स्पर्धा परिक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी व अपयशावर मात करण्याची जिद,मेहनत,चिकाटी आणि आत्मविश्वासाची गरज आहे.  चूल आणि मूल या ग्रामीण भागाच्या चाकोरीच्या बाहेर पडत स्वाती भराड यांनी मिळविलेल्या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
स्वाती भराड यांनी ओ.बी.सी.प्रवर्गातून  १९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. स्वाती भराड यांची महिला दिनी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. लहानपणापासूनच कुशाग्र बुध्दीमत्ता असलेल्या स्वाती भराड यांना अभ्यासाची गोडी असल्यामुळे इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण मिळविले तर बारावीत विज्ञान शाखेत ७२ टक्के गुण मिळविले तर बीएससी अ‍ॅग्रीमध्ये ७५ टक्के गुण संपादित केले.

स्वप्नांचा पाठलाग करणे शिका !
निसर्गाने प्रत्येक स्त्रीयांना सामर्थ्यशाली बनविले आहे. आपली बुध्दीमत्ता व क्षमतांना ओळखल्यास महिला कुठल्याही क्षेत्रात सहज यशस्वी होतात. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता यशाची स्वप्ने बघा ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची तयारी ठेवा. आपल्या अभ्यासाचे नियोजन करा. यश तुची वाट बघतेय.                                                        स्वाती सिताराम भराड,पोलीस उपनिरीक्षक दे.माळी.


बनल्या गावातील पहिल्या पोलीस अधिकारी

देऊळगांव माळी सारख्या छोटयाशा व कुठल्याही प्रकारचे स्पर्धा परिक्षा संदर्भात मार्गदर्शन उपलब्ध नसलेल्या छोटया खेडयातून पहिल्या पोलीस अधिकारी बनण्याचा मान स्वाती भराड यांनी मिळविला आहे. त्यांनी मिळविलेल्या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा