Responsive Ads Here

बुधवार, १३ मार्च, २०१९

विवेकानंद आश्रमाच्या वातावरणात स्पर्धा परिक्षेची गोडी लागली.- स्वाती भराड

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले कृषी महाविद्यालयामुळे कृषी शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकले. विवेकानंद आश्रम व कृषी महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा स्पर्धा परिक्षेसाठी खूप फायदा झाला. स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक पायाभूत तयारीची सुरूवात विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या फोरमपासून झाली. विवेकानंद आश्रमाच्या वातावरणात स्वप्नांचा अर्थ उमगल्याचे विचार स्वाती भराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना काढले. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी त्या बुधवार ता.१३ रोजी बोलत होत्या. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने पीएसआय पदी निवड झालेल्या व  विवेकानंद कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण घेतलेल्या देऊळगांव माळी येथील स्वाती सिताराम भराड यांचा शाल,श्रीफळ,महाराजश्रींचे गं्रथ व पुष्पगुच्छ देवून सचिव संतोष गोरे यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून पीएसआय म्हणून निवड झालेल्या स्वाती भराड तर पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,पत्रकार राजेश मगर तथा आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना भराड म्हणाल्या की, स्त्रीया आपल्यातील दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर कठीण वाटणारे यश सहज प्राप्त करता येते. कृषी शिक्षणाचा मला स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना खूप फायदा झाला. अनेक कृषी पदवीधर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विविध पदावर पोहचले आहेत. कृषी पदवीधरांनी स्पर्धा परिक्षेकडे वळल्यास हमखास यश मिळल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यासाठी येत असतात. येणा-या प्रत्येक संधी सोने करण्याची कसब अवगत केल्याशिवाय यश मिळत नाही. केवळ स्वप्त बघू नका तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करा असेही त्यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले. यावेळी  वसंतराव विठोबा मगर,प्रभाकर भराड,राजेश वसंतराव मगर तथा आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रेरणा पवार तर आभार कु. जान्हवी डोसे हीने मानले

मुलींच्या वसतिगृहात सुरु होणार स्पर्धा परिक्षा कक्ष
कर्मयोगी संत प.पू.शुकदास  महाराजांनी ग्रामीण भागातील ५०० मुली निवासक्षमता असलेले वसतिगृह बांधले. विशेष बाब म्हणजे या मुलींच्या वसतिगृहाच्या भूमीपुजनांचा मान प.पू.शुकदास महाराजांनी शिक्षण घेणा-या मुलांना देवून त्यांच्या हस्ते भूमीपूजन करून घेतले. वसितगृहातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या मुलींसाठी लवकर विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्पर्धा परिक्षा कक्षाची सुरूवात करण्यात येणार असून यासाठी १ लाख किमतीची  स्पर्धा परिक्षा पुस्तकांची खरेदी विवेकानंद आश्रम करणार असल्याचे यावेळी आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना सांगीतले.


विद्यार्थिनीच्या समूहामध्ये  रमल्या स्वाती भराड
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संस्थापित  विवेकानंद कृषी महाविद्यालयात विवेकानंद आश्रमाच्या वतीने सत्कार करणात आला हे माझे भाग्य आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयात कृषीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन काळापासून तयारीला सुरुवात करावी असे यावेळी पीएसआय स्वाती भराड यांनी विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना यावेळी बोलताना सांगितले. विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या समूहामध्ये स्वाती मगर रमून गेल्याचे यावेळी दिसून आले.

विवेकानंद आश्रमाच्या  वतीने स्वाती भराड यांचा सत्कार
यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने पीएसआय पदी निवड झालेल्या व  विवेकानंद कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण घेतलेल्या देऊळगांव माळी येथील स्वाती सिताराम भराड यांचा शाल,श्रीफळ,महाराजश्रींचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देवून सचिव संतोष गोरे यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा