ग्रामीण भागातील शेतकरी
वर्ग मोठया प्रमाणात पशूंचे पालन करतो. पशूधन संगोपनाचा त्याला जोडधंदासाठी उपयोग
होतो. ग्रामीण भागातील शेतक-याला पशूंच्या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे तो पशु
आजाराकडे दुर्लक्ष करतो. शेतक-यांची जनावरे आजारी असल्यास त्यांचा शेती कामावर
सुध्दा परिणाम होतो. दुधाळ जनावरे आजारी असल्यास त्यांचा दुध उत्पादनावर परिणाम
होवून दुध व्यवसायात तोटा सहन करावा लागतो.
शेतक-यांनी जनावरांच्या आजारांचे गांभीर्य ओळखावे असे प्रतिपादन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था
अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बि-हाडे यांनी केले.
कर्मयोगी संत प. पू.
शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान
विद्यापीठ नागपूर व स्नातकोत्तर पशुवैदयक व पशु विज्ञान संस्था अकोलाचे संयुक्त
विद्यामाने आयोजीत भव्य मोफत पशु रोगनिदान व उपाचार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी
शनिवार ता.१६ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात
स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप
प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे
उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु
विज्ञान संस्था अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बि-हाडे, डॉ.सी.एच.पावशे, डॉ.एम. जी. थोरात, डॉ.डे.एस. पजई, डॉ.एम व्ही. इंगवले,
डॉ. एस.डी.चेपटे, वि.कृ.व्य.व्य.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे
तथा आदि उपस्थित होते.
याशिबीरात डॉ.पी.डी.
पाटील,डॉ. भास्कर वाघमारे,डॉ.नेहा भावे,डॉ.सुमीत वैद्य यांनी शिबीरातील जनावराची तपासणी करून गरजु
जनावरावर शस्त्रक्रिया केली. या शिबीराचा लाभ परिसरातील शेतक-यांच्या जनावरांना
झाला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्ञानेश्वर जाधव,प्रा.प्रतिक उगले,प्रा.हर्षल मगर,प्रा.निलेश देशमुख,प्रा.कु.अनिता अरूळकर,प्रा.निलेश शिंदे ,प्रा.दिपक निकम,डॉ.सुनिल देशमाने,
दिपक मगर,शिवहारी हाडे,राज रौंदळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य
डॉ.सुधाकर चांगाडे,सूत्रसंचाल
प्रा.जी.के.ठाकरे तर आभार प्रदर्शन प्रा.मिनाक्षी कडू यांनी मानले.
हिवरा आश्रम येथे पशू रोगनिदान शिबीर संपन्न
विवेकानंद आश्रमाच्या
हरिहर तीर्थावर आयोजित भव्य मोफत पशु रोगनिदान व उपचार शिबीरात यावेळी ६० ते ७०
जनावरांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या शिबीरात जनावर माजावर न येणे,जनावरे गाभण न राहणे,जनावरांच्या वाताची शस्त्रक्रिया,शिंगाची शस्त्रक्रिया, शेपटीची शस्त्रक्रिया तसेच खरूज खाज येणे,जनावरांची केश गळणे इत्यादी वर शिबीरात उपचार
करण्यात आला.
ग्रामीण भागात आयोजित
करण्यात आलेल्या भव्य मोफत पशु रोगनिदान व
उपाचार शिबीरात ६० ते ७० जनावरांची तपासणी करण्यात आली. शिबिरातील काही जनावरांवर
शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. डॉ.सुधाकर चांगाडे,प्राचार्य विवेकानंद कृषी व्य.व्य. महाविद्यालय
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा