Responsive Ads Here

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

विवेकानंद आश्रम जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध - संतोष गोरे



रामकृष्ण परमहंसाच्या दिव्य सहवासाने स्वामी विवेकानंदांचे जीवन मानवतेच्या कल्याणसाठी तयार झाले. प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंदांना आपला गुरू मानून त्यांची शिकवण कृतीरूपाने आमलात आणली व विवेकानंद आश्रमाचे महानसेवा कार्य जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी कटीबध्द झाले. माणसातच देव पाहणा-या व त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कटीबध्द असलेली धर्मादाय संस्था विवेकानंद आश्रमाच्या रूपाने सामाजिक सेवेत अग्रेसीत झाली.विवेकानंद आश्रम जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केले.
विवेकानंद आश्रमात रामकृष्ण जयंती प्रसंगी ते शुक्रवार ता.८ रोजी बोलत होते. याप्रसंगी विवेकानंद जयंती महोत्सवाचा लेखाजोखा सादर करण्यात आला. उत्सवासाठी देणगी गोळा करणाया व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ संचालक दादासाहेब मानघाले, अध्यक्ष आर.बी.मालपाणी सर, उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते तथा पदाधिकारी यांनी ठाकूर रामकृष्ण परमहंस,मॉ शारदादेवी,स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दि.२५,२६ व २७ जानेवारी २०१९ ला भव्य प्रमाणात संपन्न झालेल्या विवेकानंद जन्मोत्सवाची माहिती दिली. 

यावेळी  विवेकानंद जन्मोत्सवामध्ये संपन्न झालेल्या भव्य महाप्रदासाठी परिसरातील बांधव आपले ट्रॅक्टर्स महाप्रसाद वितरणासाठी निशुल्क घेवून येत असतात. छान सजलेल्या आकर्षक ट्रॅक्टर मालकांचा यासभेमध्ये शाल, श्रीफळ व ग्रंथ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सचिव गोरे यांनी दि.१०, ११, १२ व १३ एप्रिल २०१९ रोजी विवेकानंद आश्रमात संपन्न होणा-या कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या संजीवन समाधी सोहळयाची माहिती दिली.  सभेनंतर उपस्थित सर्व विवेकानंद आश्रम परिवारातील मंडळींनी स्नेहभोजन घेतले. यावेळी विवेकानंद आश्रम संस्थेतील सर्व शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी बंधू-भगिनी व कार्यकर्ते मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा