गेल्या दोन ते तीन
वर्षापासून पावसाची सरासरी कमी झाली आहे. त्यामुळे विहीरीच्या ची जलपातळीत कमालीची
घट झाली आहे. तसेच उन्हाच्या कडाक्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी
झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे
गृहीणींचे आर्थीक बजेट कोलमडले असून भाजीपाला खरेदीसाठी आर्थिक वजेटामध्ये वाढ
झाली आहे. यावर्षी मेहकर तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे विहीरींनी तळ गाठल्यामुळे
भाजीपाला पिकाला पाणी देतांना शेतक-याला कमालीची कसरत करावी लागत आहे.
विहीरींनी तळ गाठल्यामुळे त्याचा भाजीपाला उत्पादनावर सुध्दा परिणाम होत असून शेती
उत्पादनात सुध्दा घट झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला
आहे.सद्या कडक उन्हाळा सुरू झाला असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला
आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांचे दरात सुध्दा वाढ झाल्याचे
दिसून येत आहे.
उन्हाच्या
तडाख्यामुळे भाजीपाल्याचे दरात वाढ
भेंडी ८० रूपये,मिरची ७० रूपये,गोबी ६० रूपये,टमाटे ५० रूपये,कांदे २० रूपये,बटाटे २५ रूपये,वांगी ३० रूपये,कोथींबीर १०० रूपये,मेथी १५ रूपये,पालक १० रूपये,दोडका ५० रूपये,गवार ४० रूपये
प्रति किलो,काकडी १५ रूपये,कारले ४० रूपये प्रति किलो,
सद्या बाजारात
भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या भावात वाढ झाली आहे.
भाजीपाल्यांचे दर वाढीमुळे भाजीपाला खरेदी करताना अधिक किंमत मोजावी लागत आहे. भाव
वाढल्यामुळे खरेदीसाठी गृहिनींच्या आर्थिक बजेटमध्ये वाढ झाली आहे.
सौ. कविता कोंडेकर, गृहिणी हिवरा आश्रम
भाजीपाल्याची आवक
घटल्यामुळे जास्त किंमतीमध्ये
भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
अनेकदा भाजीपाला कमी किंमतीमध्ये सुद्धा विक्री करावी लागते. दुष्काळी परिस्थीमुळे
भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे त्याचा बाजार
विक्रीवर थेट परिणाम होत आहे.
विवेक नायगांवकर
भाजीपाला विक्रेता हिवरा आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा