Responsive Ads Here

बुधवार, ६ मार्च, २०१९

श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद


 पैनगंगेच्या निर्मल,पवित्र व संथ  नदीपात्रात वसलेले दुधा ब्रम्हपूरी येथे श्रीक्षेत्र ओलांडेश्वराचे मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या राज्यभरातून हजारो भाविकांच्या गर्दीने श्रीक्षेत्र ओलांडेश्वर फुलून गेले होेते. हर हर महादेव... ओम नमः शिवाय... च्या भक्तीमय मंत्रोच्चार कानी पडता क्षणीच मन प्रसन्न झाल्याची अनुभूती भाविकांना घेतली. श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे मंगळवार ता.५ रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त सकाळपासूनच हजारो भाविकांनी दर्शन व पूजनासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वर फुलून गेले. भाविकांनी शिस्तबध्द पध्दतीने हजारो भाविकांनी हजेरी लावत दर्शन घेवून बारी पध्दतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.महादेवाच्या आरतीनंतर विदेही संत गजानन महाराज, श्रीश्री १००८ प. पू. अमोलानंद महाराज यांच्या हस्ते आणि खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमूलकर,जि.प.सदस्य संजय वडतकर, प्राचार्य नामदेव सास्ते, हभप ज्ञानेश्वर महाराज तायडे, ओलांडेश्वर संस्थानचे अध्यक्ष मंचकराव देशमुख,गंगाधर निकस,दुधा चे तंटामुक्ती अध्यक्ष अनंथा जवंजाळ,माजी सरपंच एकनाथ सास्ते,प्रा.विजय राठी  महाशिवरात्रीच्या भक्तीमय वातावरणात हजारो भक्तांनी यावेळी विधिवत मंत्रोच्चारात शिवाचे पूजन,दर्शन यावेळी घेतले. महाशिवरात्रीचे दिवशी सकाळ पासून भाविकांनी ओलांडेश्वर येथे दर्शनासाठी रीघ लागल्याचे दिसून येते होते. येथे भाविकांना एकाच मंदिरात बारा ज्योर्तिqलगाच्या qपडीच्या दर्शनाचा सहज लाभ घेता येतो. मंदिराच्या चहूबाजुंनी हिरवाईने नटलेला निसर्ग मनाला अधिकच आनंददायी करून जातो. पैनगंगा नदीच्या पात्रात वसलेल्यास या संस्थामध्ये भाविकांची महाशिवरात्रीला दरवर्षी प्रचंड गर्दी उसळते. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याने या तीर्थक्षेत्रावरती भाविकांची अतूट श्रध्दा आहे. श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानला अतिप्राचीन असा शिवकालीन इतिहास लाभला आहे. श्रावण मास, महाशिवरात्री, आषाढी,एकादशी, कोजागरी पौर्णिमा, अमावस्या या तिqथना येथे धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. महाशिवरात्री उत्सानिमित्ताने यावर्षी सुदा विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीने केले होते. सात दिवस संपन्न होणा-या या ज्ञानयज्ञात नामवंत किर्तनकारांची कीर्तने, व्याख्याने, प्रवचनांचा लाभ भाविकांनी यावेळी घेतला.



बारा ज्योर्तिलिंग दर्शनाचा योग 
भाविकांना एकाच ठिकाणी बारा ज्योर्तिलिंग दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानने मंदिरात प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये सोमनाथ, मल्लिकार्जुन, महांकालेश्वर, ओंकारेश्वर,वैद्यनाथ,भिमाशंकर,रामेश्वर,नागेश्वर,काशी, विश्वेश्वर,त्र्यंबकेश्वर,केदाननाथ,घृष्णेश्वर येथे याप्रमाणे ज्योर्तिलिंग आहेत.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा