Responsive Ads Here

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

पैनगंगा नदीच्या पुरामुळे हिरावला हातचा घास !

बुलडाणा परिसरात दि. १० सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले होते . त्यामुळे पेनटाकळी धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे पेनटाकळी धरणाचे दि. ११ १२ सप्टेंबर रोजी दरवाजे ३० सेमी उघडण्यात आले. पैनगंगा नदीला पुर आल्यामुळे पुराचे नदीकाठच्या  शेतात पाणी घुसल्यामुळे पेनटाकळी, दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर, पाचला बा-हई तथा आदि गावातील शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले. शेतातील पिकाच्या नुकसानीचे वृत्त दै. सकाळने दि.१५ सप्टेंबर रोजीच्या अंकात पेनटाकळीचे दरवाजे उघडल्याने संकट या मथळयाखाली बातमी प्रसिध्द करताच प्रशासनाला जाग आली. पैनगंगा नदीकाठच्या ९७ हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मेहकचे तहसिलदार डॉ.गरकल यांनी  दिली. यावेळी महसूल विभागाकडून पिकांची प्राथमिक पाहणी करण्यात आली. पैनगंगा नदीकाठच्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पैनगंगा नदीला पुर आल्यामुळे नदीकाठच्या  शेतात पाणी घुसले. यामुळे शेतातील सोयाबीन पिकाच्या शेंगावर मातीचा गाळ बसला. त्यामुळे शेंगा सोयाबीनचे झाड खराब होवून शेंगा काळया पडल्या आहे. याबाबत शेतक-यांनी दि. १४ सप्टेंबर रोजी मेहकरचे तहसिलदार डॉ. गरकल यांना निवदेन सादर केले होते. त्यामुळे कृषीसहाय्यक शंकर वाघमारे,तलाठी कु.भारती म्हस्के यांनी दि.१८ सप्टेंबर पासून सव्र्हेशनाचे काम सुरू केले. यामध्ये ९० ते ९७ हेक्टरवर प्राथमिक पाहणी करून सदर शेतक-यांचे नुकसानीचा आवाहल शासनास सादर करण्यात येईल असे तलाठी कु.भारती म्हस्के कृषी सहाय्यक शंकर वाघमारे यांनी सांगीतले. यामध्ये पेनटाकळी, दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर, पाचला बा-हई तथा आदि गावातील शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानी संदर्भात सर्व्हेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती मेहकरचे तहसिलदार डॉ.संजय गरकल यांनी दिली.

अल्पभूधारकांची बिकट स्थिती
पैनगंगा नदीच्या काठच्या अल्पभूधारक शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकाचे नुकसान झाले. शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे अल्पभुधारक शेतक-यांचे कंबरड  मोडले. त्यामुळे अल्पभुधारक शेतक-यांची बिकट स्थिती झाली आहे.

९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अंकात पेनटाकळीचे दरवाजे उघडल्याने संकट या मथळयाखाली बातमी प्रसिध्द करताच प्रशासनाला जाग आली. पैनगंगा नदीकाठच्या ९७ हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.



संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा