Responsive Ads Here

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

पीक संजीवके बाबत बळीराजाला मार्गदर्शन


पीक संजीवके म्हणजे काय,पीक संजीवकाचा वापर कसा करावा,पीक संजीवकाचे प्रकार कोणते,पीक संजीवके वापरण्याची पध्दती,पीक संजीवके वापरापासून होणारे फायदे कोणते याबाबत प्रात्यक्षिक माहिती दिली. शेतकरी बांधवांनी उत्पादन वाढीसाठी संजीवकाचा वापर करावा असेही यावेळी सांगितलेयावेळी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. विवेकांनद कृषी विधाता ग्रुपमध्ये काजोल पाटील,नितु जुनघरे,शिवगंगा मिसाळ,कांचन सिरसाट,स्नेहल घुगे,जुही परचाके,वैष्णवी बोर्डे,भावना सरोदे,प्रज्ञा बागडे,निकीता होने या विद्यार्थीनींचा समावेश आहे.
आधुनिक शेतीचा महत्वाचा भाग म्हणजे पीक संजीवके. बाजारात उपलब्ध असलेल्या पीक संजीवकांच्या वापराने उत्पादनातं वाढ होते. पीक संजीवकाच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशींची लांबी वाढते.संजीवकाची फवारणी केल्यामुळे फळाची पानाची होणारी गळती थांबते.वनस्पतीच्या छाट कलमांना मुळे पान फुटीसाठी मोठया प्रमाणात मदत मिळते .  विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी वनस्पतींची वाढ नियमन करण्यासाठी तसेच कृषी उत्पादन वाढ करण्यासाठी पीक संजीवक वापरणे आवश्यक असल्याची माहितीही यावेळी दिली. कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके, प्रा.गजानन ठाकरे, प्रा.मंगेश जकाते, प्रा.रवींद्र काकड यांचे मार्गदर्शन लाभत आहे

पीक संजीवकांचे फायदे
पीक संजीवकांमुळे पिकाची वाढ होते. पीक संजीवकामुळे वनस्पती मधील फ़ुल धारणा आणि फळ धारणेत वाढ होते. पीक संजीवकामुळे अनावश्यक रोपांच्या वाढीवर नियंत्रण तसेच त्यांचे समुळ उच्चाटन करणे शक्य होते. पीक संजीवक वापरामुळे फुलधारणा अधिक जोमाने करता येते.फळधारणा वाढवून किंवा फळांच्या आकारमानात वाढ केली जाऊ शकते. पिकांचे उत्पन्न दर्जा वाढविता येतो.

अशी घ्यावी दक्षता फवारणी दरम्यान
संजीवकांचा वापर शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी उष्णता वाऱ्याचे प्रमाण कमी असताना करावा. संजीवकांचा वापर करताना जास्तीत जास्त भाग वनस्पतीच्या आवश्‍यक त्या भागावर पडेल यांची दक्षता घ्यावी. कोणत्याही संजीवकाची अभिक्रिया करताना त्याचे द्रावण ताजे तयार केलेले वापरावे. कोणत्याही संजीवकाची फवारणी ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच करावी. जमिनीवरून एखाद्या संजीवकाचा वापर करावयाचा असेल, तर द्रावणाचे प्रमाण जास्त असावे. हवेतून फवारणीमार्फत द्यावयाचे असेल, तर द्रावणाचे प्रमाण कमी असावे.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंर्तगत कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी ग्रामीण भागातील शेतक-यांना पीक संजीवकाचे महत्व सांगितले.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

कृषी विधाता ग्रुपच्या वतीने वेळोवेळी शेतकरी बांधवांना कृषी सल्ला मार्गदर्शन केले जाते. शेतकरी बांधवाना पीक संजीवके याबाबत प्रात्यक्षित माहिती दिली. शेतकरी बांधवाना याचा फायदा होईल.
प्रज्ञा बागडे,विद्यार्थिनी विवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा