Responsive Ads Here

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

सुशिक्षित तरूणांची मशरूम उत्पादनात झेप


निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती, शेतकरी दिवसेंदिवस आर्थीक अडचणीत सापडत आहे. मात्र पारंपारीक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत हिवरा आश्रम येथील सुशिक्षीत भावडांनी दहा बाय दहा फुटाच्या छोटयाशा खोलीमध्ये ऑईस्टर या जातीच्या मशरूमचे उत्पादन घेत आर्थिक प्रगती साधली आहे. सुधारित पद्धतीने आळंबी उत्पादन सुरू केले. त्यासाठी त्यांनी सोयाबीन भूस यांचा वापर सुरू केला. निलेश दत्तात्रय निकस  ओम दत्तात्रय निकस अशी या भावडांची नावे असून त्यांचे शालेय शिक्षण कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात झाले आहे. त्यांनी १०० बॅग सोयाबीन कुटारावरती ऑइस्टर जातीच्या  मशरूमचे उत्पादन घेत आहेत. सद्या फ्रेश  मशरूम ला ८०० रू भाव तर  कोरडा मशरूमला  २००० रूपय भाव आहे. त्यांना १०० बॅगमधून एका महिन्याला ५० किलो मशरूमचे उत्पादन होईल अशी आशा आहे. यामुळे  महिन्याकाठी ५० ते ६० हजाराचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे.  निलेश  ओम यांनी ग्राहकांना एका कॉलवर मशरूम घरपोच पोहचविण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध करून दिली आहे.  ग्रामीण भागातील सुशिक्षीत तरूण  महिला बचत गटाला मशरूम उत्पादन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सुध्दा करणार असून ग्रामीण भागातील शेतक-यांनी उत्पादीत केलेल्या मशरूमची खरेदी करण्याचा मानस सुध्दा त्यांनी यावेळी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला. मशरूम उत्पादन हा शेतकरी बांधवांसाठी आर्थीक बळकटी देणारा असून शेतकरी बांधवांनी मशरूमचे उत्पादन घेतल्यास होईल अशी आशा सुध्दा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. मशरूम चे उत्पादन हे कुठल्याही रासायनिक खता शिवाय होत असून सेंद्रिय आहे. एका थैलीसाठी १०० ग्रम मशरूम कल्चर लागत असून त्यापासून ५० किलो मशरूमची निर्मिती होते. यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादनाची हमी मिळते.

बचत गटांना मशरूम उत्पादनाबाबत  मार्गदर्शन
ग्रामीण भागातील छोट्या छोट्या बचत गटांना मशरूम उत्पादन संदर्भात मार्गदर्शन केल्या जाणार आहे, यामुळे ग्रामीण भागातील बचत गटांना रोजगाराचे प्रशिक्षण मिळणार आहे.

एका कॉलवर दिल्या जाते घरपोच सेवा
एखाद्या ग्राहकाला मशरूम हवे असल्यास त्यांनी कॉल केल्या बरोबर त्याची मशरूम ची ऑर्डर घरपोच देण्याची सुविधा सुद्धा पुरविण्यात येत असल्यामुळे ग्राहक अत्यंत खुश आहे. ताजे मशरूम घरपोच मिळत असल्यामुळे ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

मशरूम प्रोडक्ट निर्मितीचा मानस
मशरूममध्ये प्रथिनेकॅल्शियमव्हिटॅमिनलोहसेलेनियमअँटिऑक्सीडेंट व खनिजेनियासीन पोटॅशियमफॉस्फरस भरपूर प्रमाणात आहे. दैनंदिन जीवनात मशरूमचा वापर वाढावाग्रामीण भागात मशरूमचे महत्व पटविण्यासाठी मशरूम पापड,मशरूम प्रोट्रीन पावडर,मशरूम लोणचे उत्पादन करणार आहे.

जिद्द,चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळते याची कल्पना असल्यामुळे मशरूम उत्पादनाकडे वळलो. सध्या मशरूमचे उत्पादन अपेक्षापेक्षा चांगल्याप्रकार होत आहे.
                                                                              निलेश निकस, मशरूम उत्पादक हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा