Responsive Ads Here

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

विवेकानंद महाविद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ विभागावर


कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलीच्या व्हॉलीबॉल संघाची विभागीय स्तरावर निवड झाली. बुलडाणा येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे ता.१९ रोजी पार पडलेल्या १९ वर्षाच्या आतील मुलीच्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये चिखली संघाला पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावून विवेकानंद विद्या मंदीराच्या मुलीच्या संघाची विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कु.शितल बोरकर,कु.पल्लवी पुरी,शिवाणी पारधे,कु.प्रतिक्षा जाधव,कु.कोमल म्हस्के,कु.वैष्णवी काळे,कु.गायत्री खोरे,कु.क्रांती पागोरे,कु.नेहा दुनगू,कु.कल्याणी शेळके,कु.वैष्णवी हिवाळे,कु.संजिवनी जवंजाळ या विद्यार्थीचा समावेश आहे. या खेळाडूची तयारी क्रीडा शिक्षक रणजीत जाधव,आत्मानंद थोरहाते,गोविंद अवचार,श्याम खरात यांनी करून घेतली. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,प्राचार्य कैलास भिसडे,उपप्राचार्य अशोक गि-हे, पर्यवेक्षक देवेंद्र मोरे,आत्माराम जामकर यांनी  यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

1 टिप्पणी: