पत्रकार आपल्या
लेखनीच्या माध्यमातून समाजातील अन्याला वाचा फोडण्याचे काम अविरतपणे करीत असतात.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजामध्ये लेखनीच्या माध्यमातून
समाजजागृतीचे कार्य करीत असतो. निर्भिडता हा पत्रकाराचा प्रमुख गुण आहे. पत्रकारच
समाजाचे खरे मार्गदर्शक असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते
यांनी रविवारी पत्रकार दिनी विवेकानंद आश्रमात अयोजित पत्रकार बांधवांच्या सत्कार
सोहळया प्रसंगी बोलतांना काढले.
पत्रकार सतत आपल्या
कार्यात मग्न असल्यामुळे नकळतपणे त्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे
विवेकानंद आश्रमात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी
करून औषधी देण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा विवेकानंद आश्रमाच्या
वतीने उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पू.महाराजश्रींचे ग्रंथ
देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी दै. देशोन्नतीचे पत्रकार समाधान म्हस्के
पाटील,दै. सकाळ संतोषबापू थोरहाते,दै.दिव्यमराठीचे शिवप्रसाद थुट्टे,दै.पुण्यनगरीचे
सदाशिव काळे,दै.तरूण भारतचे प्रा.मधु आढाव हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन शिवप्रसाद थुट्टे यांनी तर आभार संतोष थोरहाते यांनी मानले. यावेळी
सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते तथा आदि हजर होते.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास'
विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा