विवेकानंद आश्रमात दि. २५ ते २७ जानेवारी ला विवेकानंद जयंती महोत्सव अत्यंत
भव्य प्रमाणात संपन्न होणार आहे. विवेकानंद नगरीत तीन दिवस संपन्न होणा-या यात्रा
महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून लाखो भाविक भक्त
मोठया संख्येने सहभागी होत असतात. यावर्षी शनिवार, रविवार लागून आल्याने भावीकांची
संख्या वाढणार आहे. उत्सवा दरम्यान आयोजीत केलेल्या दर्जेदार कार्यक्रमाचा आनंद
घेण्यासाठी रसीक मोठया प्रमाणात येत असतात. सुटी आल्यामुळे कार्यक्रम मंडपातील
रसीकांची संख्या सुध्दा वाढणार आहे. गर्दीचा फायदा घेणारे अवैध धंदे करणारे, चोरी
करणा-यांना कोणतीही संधी मिळू नये, यात्रा निर्विघ्नपणे संपन्न व्हावी भावीकांना
उत्सवाचा व यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी संस्थेच्या वतीने आश्रम परिसरासोबतच
यात्रेमध्ये सुध्दा सी.सी.टी.व्ही. कॅमेèयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वयंशीस्तीसाठी प्रसिध्द असलेला विवेकानंद जयंती महोत्सव कुढल्याही अनुचित
प्रकाराशिवाय दरवर्षी पार पडतो. दोन लाख भावीक महापंगतीत प्रसाद घेतांना जी शिस्त
पाळतात ती वाखण्याजोगी असते त्यामुळे ही महापंगत पाहण्यासाठी दुरदुरुन भावीक व
पर्यंटक येत असतात. प.पू.शुकदास महाराजांप्रती असलेली अपार श्रध्दा व महाप्रसादाचे
पावित्र्य राखतांना महाप्रसाद घेण्यासाठी जमा झालेला हा जनसमुदाय अत्यंत शांततेचे
प्रदर्शन करतो. पोलीसांचा चोख बंदोबस्त यावर्षी सुध्दा राहणार असून उत्सव व यात्रा
पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्रमाचे वतीने सांगण्यात आले.
बुधवारी ता.२३ रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यादव यांनी यात्रा परिसराची
पाहणी करुन व्यवस्थेबदद्ल समाधान व्यक्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर
व्यंजने व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शन व
नियंत्रणात पोलीस विभाग अत्यंत दक्षतेने बंदोबस्त ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी
सांगीतले.
विवेकानंद जयंती महोत्सव यावर्षी प्रचंड गर्दी होणार असून
भाविकांना पुरविल्या जाणारी सेवेची पुर्ण तयारी झाली आहे. यात्रेत गर्दीचा फायदा
घेणा-या भामटयांचा त्रास भाविकांना होवू नये. जयंती महोत्सव व त्यानिमित्त भरणारी
यात्रा या दोन्ही कार्यक्रमात भाविकांना संस्थेने सहभागी होता यावे. दर्जेदार
कार्यक्रमांचा आनंद घेता यावा व यात्रेते खरेदी करता यावी यासाठी संपूर्ण आश्रम व
यात्रा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत आणण्यात आला आहे.
संतोष गोरे सचिव विवेकानंद आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा