महाराष्ट्रात युगाचार्य स्वामी विवेकानंद
यांच्या नावाने केवळ हिवरा आश्रम येथेच साजरा होणा-या विवेकानंद जन्मोत्सवास
येत्या २५ जानेवारी २०१९ रोजी सुरुवात होणार असून, रविवारी ता.२७ रोजी भव्य
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ते २७ जानेवारी असे तीनही दिवस भरगच्च
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या महाप्रसाद वितरण सोहळ्यास
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी
माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी
बोलतांना दिली.
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी ग्रामीण भागात
विवेकानंदांच्या नावाने साजरा होणाèया या उत्सवाची सुरुवात केली असून, राज्यात
केवळ हिवरा आश्रम येथेच इतक्या भव्य प्रमाणात हा जन्मोत्सव साजरा होतो. यानिमित्त
दि. २५, २६ व २७ जानेवारी रोजी भरगच्च सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. दि.२५ जानेवारी रोजी पहाटे ७ ते ८.३० हभप. थुट्टेशास्त्री महाराज
यांचे प्रार्थना व व्याख्यान, ८.३० ते ९.३० विवेकानंद आश्रमाच्या संगीत
विभागाच्यावतीने अनुभूति गायन, ९.३० ते १०.३० हभप. येवलेशास्त्री महाराज यांचे
प्रवचन, सकाळी १०.३० ते १२ वाजता वेदांताचार्य, विद्यावाचस्पती गजाननदादा शास्त्री
यांचे व्याख्यान व त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजता हभप. महंत उद्धव महाराज मंडलिक
यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी २ ते ५ कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या
आसनस्थ मूर्तीची शेकडो भजनी मंडळांच्या साथीने लेझिम, ढोल, मृदंगांच्या गजरात भव्य
शोभायात्रा निघणार आहे. दुपारी ५ ते ६.३० वाजता ८९ व्या अखिल भारतीय साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व्याख्यान
सायंकाळी ६.३० ते ८ वाजता प्रख्यात वक्ते विवेक घळसासी यांचे व्याख्यान होईल. तर
रात्री ८ ते ९ वाजता हभप. वैराग्यमूर्ती पोपट महाराज यांचे यांचे कीर्तन होईल.
रात्री ९ ते १० सप्तखंजेरी वादक, राष्ट्रीय कीर्तनकार संदीपपाल महाराज गिते यांचे
कीर्तन पार पडणार आहे.
दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ८.३० हभप. थुट्टेशास्त्री
महाराज यांचे प्रार्थना, व्याख्यान, ८.३० ते ९ विवेकानंद आश्रम संगीत विभागाचे
अनुभूति गायन, सकाळी ९ ते १० वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे व्याख्यान, १०
ते ११.३० प्रसिद्ध विचारवंत डॉ. पी.जी.लुलेकर यांचे व्याख्यान, दुपारी ११.३० ते
१.३० हभप.महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन तर दुपारी दीड ते ३ वाजता प्रख्यात
विचारवंत विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान होणार आहे. ३ ते ५ वाजता वारकरी
महामंडळाचे अध्यक्ष हभप. प्रकाशबुवा जवंजाळ यांचे हरिकीर्तन, त्यानंतर ५ ते ६.३०
प्रख्यात विचारवंत श्रीपाल सबनिस यांचे व्याख्यान पार पडणार आहे. सायंकाळी ६.३० ते
८ विवेक घळसासी यांचे व्याख्यान, रात्री ८ ते ९ हभप. उमेशमहाराज दशरथे यांचे
कीर्तन तर रात्री ९ ते १० शिवशाहीर संतोष साळुंके व त्यांच्या सहकारी यांची
शिवशाहिरी आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात ७ ते ९.३० वाजेपर्यंत
वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे प्रार्थना व व्याख्यान तर त्यानंतर
विवेकानंद आश्रम संगीत विभागाच्यावतीने अनुभूति गायन होणार आहे. ९.३० ते ११.३०
वाजता श्री.श्री.श्री.१००८ हरिचैतन्यानंद स्वामी महाराज गुरूदेव आश्रम पळसखेड
सपकाळ यांचे कीर्तन, ११.३० ते १ प्रख्यात लेखक, विचारवंत डॉ. गिरीष दाबके यांचे
व्याख्यान तर दुपारी १ ते २ अंजनगाव सूर्जी येथील देवनाथपीठाचे पीठाधीश पू.
जितेंद्रनाथजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दुपारी २ ते ५ भव्य महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून,
या महाप्रसादास अडिच लाख भाविकांची उपस्थिती गृहीत धरण्यात आली आहे. दुपारी ५ ते
६.१५ वाजता मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. राजशेखर सोलापुरे यांचे
व्याख्यान, ६.१५ ते ७.३० प्रख्यात विचारवंत विवेक घळसासी यांचे व्याख्यान, तर
सायंकाळी ७.३० ते ८ वाजता प्रार्थना, पू. शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन
सोहळा पार पडणार आहे. रात्री ८ ते ९ हभप. जगन्नाथमहाराज पाटील यांचे कीर्तन, ९ ते
९.३० हभप. उद्धवराव गाडेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. रात्री साडेनऊनंतर
झीटीव्हीफेम स्वरसम्राट रामानंद उगले यांच्या शाहिरीच्या कार्यक्रमाने विवेकानंद
जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.
विवेकानंद जन्मोत्सव हा दैनंदिन विविध त्रासांनी ग्रस्त असलेल्या
मानवी मनाला प्रफुल्लित करून त्याला जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम करतो.
विवेक आनंदाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांनी आवर्जुन यावे.
आर. बी. मालपाणी,अध्यक्ष विवेकानंद आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा