जगात
प्रत्येकजण दुःखी आहे. कारण, तो अज्ञानाचा सामना करत आहे. लोभ आणि अज्ञान सोडले तर
दुःखमुक्त होता येते, असे प्रतिपादन हभप. निवृत्तीमहाराज शास्त्री यांनी केले. विवेकानंद
जन्मोत्सवानिमित्त आयोजित प्रवचनात श्री शास्त्रीजी बोलत होते.
विवेकानंद
जन्मोत्सवाची सुरुवातच शुक्रवारी हभप. निवृत्तीनाथमहाराज शास्त्री यांच्या व्याख्याने
पार पडली. दुःखमुक्तीचे आणि संतांच्या अवतार कार्याचे महत्व शास्त्रीजी यांनी आपल्या
व्याख्यानातून प्रतिपादीत केले. ते आपल्या व्याख्यानात ते म्हणाले, की जगात प्रत्येक
व्यक्ती दुःखी आहे. दुःखाला अज्ञान हेच प्रमुख कारण आहे. संतांनी व महान पुरुषांनी
दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला आहे. लोभ सोडला तर दुःखमुक्त होता येते. संतांनी जगाला
दुःखातून बाहेर काढण्यासाठी मोह, माया, लोभ यांचा त्याग करण्याचे सांगितले. संतांच्या
शिकवणीनुसार वागाल तर निश्चितच दुःखातून बाहेर पडाल, असेही शास्त्रीजी म्हणाले. संतांकडे
सर्वोत्तम विवेक असतो. विवेकामुळेच संतत्व प्राप्त होते. संत हे पथदर्शी आहेत, संत
सर्वांच्या सुखाचा विचार करतात. स्वतः हालअपेष्टा, कष्ट सोसून संतांनी जगाला ज्ञान
आणि सुखच दिले आहे, असेही याप्रसंगी हभप. निवृत्तीमहाराज शास्त्री यांनी सांगितले.
ज्ञानामुळे
मनुष्य सुखाच्या जवळ पोहोचतो, असे सांगून शास्त्रीजी म्हणाले, की वारकरी सांप्रादाय
हा ज्ञानाचा प्रसार करणारा महत्वाचा समाज आहे. गीता, भगवत यांच्या माध्यमातून समाजाला
परमार्थिक ज्ञान मिळते. जीवनात ज्ञान हे महत्वाचे आहे, परंतु ज्ञानाला प्रेमाचे अधिष्ठाण
असेल तर जीवन अधिक समाधानी बनते, असेही ते म्हणाले.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा