रंजल्या गांजल्या व
व्याधीग्रस्तांसाठी संपूर्ण जीवन सर्मपीत करून शिव भावे जीव सेवेचा मंत्र
अंगिकारणा-या... दीड कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात
आनंद निर्माण करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमाव्दारे
सुरू असलेले मानवसेवेच्या सेवाभावी
उपक्रमांविषयी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना विशेष प्रेम व आपुलकी होती. विवेकानंद आश्रम व कर्मयोगी
संत शुकदास महाराजांविषयी भाऊसाहेब फुंडकर यांना निस्मिम प्रेम,आपुलकी व ओढ होती.
विवेकानंद आश्रम भेटीचा योग आला की भाऊसाहेब तासनतास विवेकानंद आश्रमात हरवून जात असत. विवेकानंद
आश्रम सदिच्छा भेटी प्रसंगी विविध मानवसेवेच्या उपक्रमांना भेट देवून ते आस्थेवाईकपणे चौकशी करीत असत.
कर्मयोगी संत शुकदास महाराज यांच्या भेटीसाठी ते न चुकता विवेकानंद आश्रमात येत
असत. सदिच्छा भेटी दरम्यान कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज व भाऊसाहेबांमध्ये महाराजांच्या
अनिवासी यांचा निवासस्थानी विविध विषयांवर
चर्चा रंगत असे.
शेती व शेतकरी यांचे जीवन उन्नत करण्यासाठी भाऊसाहेबांची असलेली
तळमळ महाराजांना खूप आवडायची. भाऊसाहेब म्हणजे शेतक-यांच्या समस्या निर्वाणासाठी सदैव तत्पर असलेला लोकनेता अशी
भावनाही महाराजश्री नेहमीच बोलून दाखवित असत. ग्रामीण भागात कर्मयोगी संत शुकदास
महाराज यांनी सुरू केलेल्या कृषी,शिक्षण,आरोग्य व आध्यात्माचे मानवसेवा उपक्रमांविषयी भाऊसाहेबांना विशेष जिव्हाळा
होता. रंजल्या गांजलेल्यांची सेवा व समाज सुशिक्षीत करण्याचे मोठे कार्य कर्मयोगी
संत शुकदास महाराज व विवेकानंद आश्रम करीत असल्याचा भाऊसाहेबांना अभिमान होता. एकदा भाऊसाहेबांना पाठदुखीचा त्रास होत होता. तेव्हा त्यांनी महाराजश्रींकडे उपचार घेतला. त्या उपचारामुळे त्यांना आराम सुध्दा मिळाला होता. कृषी मंत्री असतांना भाउसाहेबांना नेहमी शेतक-यांना
न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने बुलडाणा
जिल्हासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पोरका झाला आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
मो.९९२३२०९६५८
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
🚩 🌿 🍀 🌿 🌹 🙏
उत्तर द्याहटवा