कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विवेकानंद ज्ञानपीठाने ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या होण्याच्या दृष्टीने हिवरा आश्रम येथे ३० दिवसीय बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या बालसंस्कार शिबीराला परिसरातील १०० ते १५० मुले मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोवळया बालमनावर संस्काराचे बीज रूजविणे,विद्याथ्र्यांमधील सुप्त कलागुणांना शिबीरा दरम्यान चालना देणे, विद्यार्थ्यांतील कलासक्तपणाची जोपासणा करणे,त्यांच्या सृजनशक्तीला चालना देवून त्यांच्यातील अभिरूचीनुसार पंखाना बळ देणे हा शिबीराचा हेतू आहे.
विवेकानंद ज्ञानपीठात दि.४ मे ते ४ जून दरम्यान सुरू असलेल्या हया शिबीरात मुलांच्या व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. बालमनावर नैतिकता,प्रामाणिकता,सचोटी,राष्ट्रप्रेम,निर्व्यसनी,निर्भीडपणा ,सदाचार या सारख्या मूल्याचे संवर्धन या शिबीरात सातत्याने होत आहे. शिबीरातील मुलांना निसर्गरम्य वातावरणात तणावमुक्त शिक्षण पध्दतीने शिकविले जात आहे. या बालसंस्कार शिबीरात शिबरार्थीनी शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मिळून त्यांचे भावविश्व समृध्द केले जात आहे. शिबीरार्थींना परिसर,पर्यावरण,समाज स्वावलंबन,या विषयाचे भान येवून बांधिलकीची भावना निर्माण होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या शिबीराचा ४ मे रोजी प्रारंभ झाला असून आहे. शिबिरात ६ ते १६वर्ष वयाच्या बालकांना सहभाग घेतला आहे. शिबीरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषीकांने सन्मानित करण्यात येईल. सदर शिबीर यशस्वीतेसाठी विक्रांत राजपूत,रवि लोखंडे,समाधान वाघचौरे,योगशिक्षक नाना इंगळे,प्राचार्य मधुकर परिश्रम घेत आहे.
शिबीरार्थींसाठी विविध कार्यक्रम
बालसंस्कार शिबीरात शिबीरार्थीना योगासने,मंत्रोच्चार व श्लोक,इंग्रजी संभाषण,बौध्दीक क्षमता विकास,चर्चा सत्र,मंनोरंजनात्मक खेळे,स्टेज डेअरिंग,संगणक प्रोजेक्टर व्दारे शिक्षण, मैदानी मनोरंजन खेळ, परिसर क्षेत्र भेट व सहल, प्रार्थना, वन मिनीट अॅक्टीवीटी,हस्ताक्षर सुधारणा या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करत आहे.
उत्तम संस्कार हे बाल-वयातच केले तर पुढील पीढी ही सदाचारी, मोठयाचा आदर करणारी, समाजात उत्तम नाव कमावणारी होईल. तसेच लहान मुलांमध्ये लहापनापासून आध्यात्माची ओढ निर्माण झाली तर संस्कारक्षम पिढी तयार होण्यास चांगली मदत होईल या उदेशाने ही ३० दिवशी बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
लेखक
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा