हिवरा आश्रमचा जेष्ठ नागरीक बनला काष्ठशिल्पकार

                                                                                                                 आयुष्यातील निर्भेळ आनंदाची अनुभूती व शाश्वत सुखाची अभिलाषा असणा-यांनी कुठला ना कुठला तर छंदाची जोपासना करावी. छंद हा माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवितो. कुणी तरी असे म्हटले आहे की, वाढत्या वयाला जर हरावयाचे असेल तर आपले छंद जीवंत ठेवून त्याची जोपासना करायला शिका मग बघा आयुष्य किती आनंदी होतेयाचाच प्रत्यय येतो मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या छोटयाशा गावातील जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते यांच्याकडे पाहिल्यावर. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते आपल्या छंदाची जोपासना करीतटाकाऊ लाकडापासून आकर्षक, सुबक, रेखीव व मोहक विविध काष्ठशिल्प निर्माण करून लुप्त होणा-या कलाकृतींना पुन्हा संजीवनी देण्याचे काम केले आहे. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण थोरहाते यांची छंदातून निर्मित केलेली काष्ठशिल्प खरोखर इतर जेष्ठांसाठी निश्चितच प्रेरणा व उर्जा देणारी ठरत आहे. जेष्ठ नागरीकांनी उतारवयात आपल्या वेळेचा सदुपयोग करीत छंदाची जोपासना केल्यास विविध कलाकृती साकार होवू शकतात हे श्रीकृष्ण थोरहाते यांनी आपला छंदातून दाखविले आहे. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण थोरहाते यांनी टाकाऊ लाकडापासून बनविलेल्या काष्ठशिल्पाचे परिसरात कौतुक होत आहे. वाढत्या वयात जेष्ठांनी आपल्या छंदाची जोपासना केल्यास त्यापासून स्वतःला तर आनंद मिळतो व आपल्या छंदापासून इतरांना सुध्दा आनंद मिळतो हे काष्ठशिल्पकार श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते यांनी समाजापुढे दाखवून दिले आहे.

जेष्ठ नागरीक असणा-या श्रीकृष्ण थोरहाते यांनी काष्ठशिल्प निर्मितीचे कुठल्याही प्रकारचे व्यावसासिक प्रशिक्षण घेतले नसून केवळ अभिजात सौंदर्यदृष्टी,सूक्ष्म निरीक्षण व कामातील सातत्य या कलागुणांच्या बळावर त्यांनी अनेक काष्ठ शिल्प साकारले आहे. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी श्रीकृष्ण थोरहाते यांच्या कलाकौशल्याचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला असल्याचे त्यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगितले.

टाकाऊ लाकडापासून काष्ठशिल्पे
श्रीकृष्ण थोरहाते यांनी टाकाऊ लाकडापासून भगवान शिव,बालाजी,भगवान बौध्द,श्रीकृष्ण,स्वामी विवेकानंद,गणपती,महावीर,हत्ती,गायी,घोडे,साप,बैलगाडीअशी विविध काष्ठशिल्पे तयार केली आहेत.

प्रत्येक जेष्ठ नागरीक सुद्धा आपल्यातील अंगभूत असलेल्या कला व छंदातून विविध आकर्षक वस्तुंची निर्मीती करू शकतोमला छंद जोपासनेतूनलुप्त कलाकृतीचे संवर्धन करीत असल्याचा आनंद आहे.
                                        श्रीकृष्ण थोरहाते जेष्ठ काष्ठशिल्पकार हिवरा आश्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा