आधुनिक जीवनशैलीमुळे वाढतोय लठ्ठपणा !

fatness in child साठी इमेज परिणाम
आधुनिक जीवन शैली व आहारातील होणा-या बदलामुळे लहान मुलातील लठ्ठपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणामुळे लहानपणात मुलांना अनेक व्याधी जडण्याचा धोका सुध्दा नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना फास्ट फुडपासून दूर ठेवल्यास व काही दैनंदिन जीवनात थोडे फार बदल केल्यास लहान मुलातील लठ्ठपणावर नियंत्रण मिळविता येते. सद्या शहरी तसेच ग्रामीण भागातील लहान मुलांमधील लठ्ठपणा हा पालकांमधील चिंतेचा विषय बनला आहे. लठ्ठपणामुळे लहान मुलांचा आत्मविश्वास कमी होवूनत्यांच्यामध्ये निराशा निर्माण होते. लहान मुलांचे वजन वाढू नये म्हणून वेळोवेळी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही पालक आपल्या लहान मुलाचे वजन कमी करण्यासाठी त्याला मैदानी खेळाकडे पाठवितात. साधारणपणे ८ ते १० वर्षांची मुले असतांना शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी ती वाढत जाते परिणामी लहान मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. लहान मुलांचे वजन वाढीमागे अनेक कारणे असली तरी मैदानी खेळाचा अभाव, सतत एकाच ठिकाणी बसून राहणे,टि.व्ही.मोबाईल,कॉम्प्युटर वरती गेम खेळणे इत्यादी मुळे लहान मुलांचे वजन वाढते. काही मुलांमधील लठ्ठपणा हा अनुवांशिकतेमुळे असतो. तर काही मुलांच्या आहार व जीवनशैलीतील बदलामुळे त्यांचे वजन वाढून मुलांना लठ्ठपणा येतो. लहान मुलांना सकस व सात्वीक आहार द्यावा. लहान मुलांना जेवणात जास्त प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा. मुलांमधील लठ्ठपणा कायम राहल्यास मुलांमध्ये हदयविकार,उच्च रक्तदाब,हाडांचे आजार व संधीवात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय मधुमेह होण्याची शक्यता सुध्दा वाढते.

मुलांच्या खाण्यावर ठेवा नियंत्रण
महान मुलांना जास्त चरबी असलेले पदार्थ खाण्यामध्ये देवू नये. याशिवाय कर्बोदके असलेल्या  पदार्थांपासून लहान मुलांना दुर ठेवावे. जास्त उष्मांक असलेले पदार्थ,समोसाबर्गर,वडापाव,आईस्क्रीम पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

लहान मुलांमधील स्थूलतेची कारणे
सोशल मिडीयाच्या काळात मुले मैदानी खेळ सोडून मुले मोबाईलकॉम्प्युटर आणि टी.व्ही.पाहण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे शरीराची  हालचाल न झाल्यामुळे चरबी वाढते.

आपल्या पाल्याचे वजन वाढून लठ्ठपणा येत असेल तर डॉक्टरांशी चर्चा करावी. मुलांच्या दिनचर्येत बदल करून त्यांना मैदानी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे.                                                                                                  डॉ.विशाल सुरूशे बालरोगतज्ञ,मेहकर



लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा