शेतकरी
बळीराजा माझा
आहे कष्टकरी
उगवी भाकरी
माझ्यासाठी !
काळी आई त्यासी
खुप माया करी
फुटतसे उरी
हिरवाई !
कुंकवाचा धनी
जपते वायरी
तीही कष्ट करी
त्याच्यासवे !
झोक्याची ग दोरी
तुझ्यासाठी पोरी
नको फासावरी
लावू देवू !
कर्ज डोई वरी
तुच माफ करी
'देवा' दरबारी
माफी असे !
उगवतो सुर्य
रोज माथ्यावरी
तो ही कष्ट करी
तुझ्यासाठी !
लिहून घे पीक
सातबार्यावरी
त्याची पैसेवारी
त्यालाच दे !
गरिबी नको रे
ही दुनियेत
करावी हुशारी
जगायाला !
राधिका देशपांडे.
शेगांव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा