मनुष्याच्या जीवनात संकटे येतात आणि जातात. जीवनातील येणा-या संकटांना न घाबरता धैर्याने,संयमाने सामोरे जावे. संकटामुळे माणसाच्या क्षमतांचा विकास होतो. ज्याप्रमाणे अग्निमध्ये सोन सुलाखून त्याची किंमत वाढते, त्याचप्रमा णे संकटांचा सामना केल्यामुळे व्यक्तीच्या धैर्यात,संयमात वाढ होते. संकटाच्या प्रसंगी आत्मविश्वासासोबत विवेकाने संकटांना सामोरे जा. संकटाच्या वेळी बुध्दी स्थिर ठेवा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजित आनंद साधना बालसंस्कार शिबीरात शुक्रवारी शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना थोरहाते म्हणाले की, बालमनावर संस्काराचे बीजारोपणासाठी आनंद साधना संस्कार शिबीर महत्वाची भूमीका बजावत आहे. संस्कार शिबीराच्या माध्यमातून संस्कारासोबत सामाजिक जाणीव वृध्दीगंत होण्यास मदत मिळते. भगवान बुध्द, शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातील प्रेरक प्रसंगांचे वर्णन करून विद्यार्थ्यांना मार्गदर् शन केले. महापुरूषांच्या विचारांचे अनुकरण करून जीवनात यश संपादीत करा असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रांत राजपूत तर आभार रवि लोखंडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा