Responsive Ads Here

गुरुवार, २४ मे, २०१८

विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भानुदास भोंडे, प्रा.शिवशंकर काकडे नेट उत्तीर्ण


 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित  विवेकानंद कृषि महाविद्यालयातील  किटकशास्त्र या विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ.भानुदास नामदेव भोंडे व प्रा.शिवशंकर पांडुरंग काकडे यांनी भारतीय अनुसंधान कृषि परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या नीट या परिक्षेत यश संपादित केले.
ग्रामीण भागातील गोर गरीब, हुशार,होतकरू शेतक-यांच्या  मुलांना  कृषि शिक्षणाची संधी उपलब्ध होवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यामाध्यमातून  त्यांचे जीवनमान उंचावून त्यांची आर्थीक प्रगती व्हावी म्हणून कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्रीं हिवरा आश्रम येथे ग्रामीण भागात कृषीची दोन महाविद्यालये सुरू केली. विवेकानंद कृषि महाविद्यालयाने आतापर्यंत ग्रामीण भागातील शेतक-यांना शेतकरी मार्गदर्शन शिबीरे,कृषी चर्चा सत्रे , पिक लागवड तंत्रज्ञान,खते व पाणी व्यवस्थापन,किड नियंत्रण,तण नियंत्रण यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा फायदा अनेक शेतकरी बांधवाना झाला आहे.  विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातून आतापर्यत ग्रामीण भागातील  हजारो हुशार,होतकरू विद्यार्थ्यांनी  शिक्षण घेतले असून ते विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.
 प्रा.शिवशंकर काकडे व प्रा.डॉ.भानुदास भोंडे यांनी विवेकानंद कृषि महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून  ते याच कृषि महाविद्यालयात किटकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे हे विशेष.  यशाबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,नारायण भारस्कर,प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी अभिनंदन केले.

२ टिप्पण्या: