Responsive Ads Here

शनिवार, १९ मे, २०१८

चिमुकल्यांनी उचलला जनजागृतीचा विडा !




प्लास्टिक पिशव्यांचा होणारा  अतिवापर टाळण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने  राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होवून मोठया प्रमाणात प्रदुषण होते. पिशव्यांच्या वापरावरती  बंदी जरी असली तरी काही ठिकाणी अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा पर्यावरणाचे रक्षण करा या हेतूने  हिवरा आश्रम येथे  विवेकानंद ज्ञानपीठात सुरू असलेल्या आनंद साधना संस्कार शिबीरातील चिमुकल्यांनी कागदापासून कागदी पिशव्या तयार करीत पर्यावरण रक्षणाचा समाजाला संदेश देवून जगजागृती केली आहे. प्लास्टिक पिशव्याच्या वापराने प्रदुषणात मोठया प्रमाणात वाढ होते. येथील आनंद साधना संस्कार शिबीरातील विद्यार्थ्यांनी कागदापासून विविध पिशव्यांची निर्मिती करून प्लास्टिक पिशव्या मुक्त अभियानाला आपल्या कृतीतून साकार करून या चिमुकल्यांनी जनजागृतीचा विडा उचलल्याने त्या चिमुकल्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजीत आनंद साधना संस्कार शिबीरात परिसरातील जळपास १०० ते १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  आहे. या शिबीरात विद्याथ्र्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अत्यावश्यक असणा-या विविध बाबी प्रामुख्याने शिकविल्या जात आहे. सकाळी ५ वाजता योग प्राणायामापासून विद्यार्थ्यांच्या दिनचर्येला सुरूवात होते. दिवसभर शिबीरात शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षणासोबत विविध सामाजिक जाणीवा वृध्दीगंत होणारे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. दररोज विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील व्यक्तीचे नियमीतपणे मार्गदर्शन लाभत असून दररोज विविध सामाजिक उपक्रम या शिबीरात प्राचार्य मधुकर आढाव,विक्रांत राजपूत,रवि लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी यशस्वीपणे राबवितात.

पर्यावरण रक्षणाचा मंत्र
आनंद साधना संस्कार शिबीरात चिमुकल्यांच्या बालमनावर सुसंस्कारासोबत राष्ट्रप्रेम,सदाचार,नीतीमुल्यांची जोपासना,वडीलधा-यांचा आदर यासोबत पर्यावरण रक्षणार्थ प्रदुषण टाळा आरोग्य जपा,वृक्ष लागवड,पर्यावरण संवर्धनाचे धडे सुध्दा शिकविले जातात. या शिबीरात पर्यावरण रक्षणाची शपथ सुध्दा विद्यार्थ्यांना या शिबीरा दरम्यान देण्यात आली आहे.

प्लास्टिक पिशव्याच्या वापराने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.  आम्ही शिबीरात दरम्यान कागदी पिशवी निर्मितीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देवून जनजागृती करण्याचा छोटा प्रयत्न केला.                                                                                                                                      गौरव प्रकाश वानखेडे,शिबीरार्थी हिवरा आश्रम

आनंद साधना संस्कार शिबीराला परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. संस्कार शिबीरात विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना चालना मिळत आहे.
                                                    मधुकर आढाव,प्राचार्य विवेकानंद ज्ञानपीठ


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा