Responsive Ads Here

बुधवार, ९ मे, २०१८

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार मोफत माती परीक्षण


विवेकानंद आश्रम व इफकोचा संयुक्त उपक्रमदररोज ५० नमुन्याची होईल तपासणी

कर्मयोग संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद कृषी महाविघालय व इफको सारखी दर्जेदार संस्था यांच्या संयुक्त विघमाने २१ मे ते २७ मे पर्यंत मोफत माती तपासणी करून देणार आहे माती परीक्षण व्हॅन परिसरातील गावांमध्ये जाउन शेतक-यांच्या बांधावरच मातीचे नमुने घेवून तपासणी करून तिथेच रिपोर्ट देणार आहे. शेतक-यांना मातीचे नमुने घेवून प्रयोगशाळेचे हेलपाटे मारावे लागतात या उपक्रमामुळे शेतक-यांचा त्रास वाचणार असून जागेवरच त्याला रिपोर्ट मिळणार आहे. सोबतच तज्ञांचे मार्गदर्शनाने पिकांची निवड व पिक व्यवस्थापनाबद्दल महत्वाची शास्त्रीय माहीती मिळणार आहे.
शेतीचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. सुधारीत खात्रीशीर बियाणेउच्च तंत्रज्ञानाचा वापर त्यासोबतच मातीचे परिक्षण ही अत्ंयत महत्वाची बाब आहे. जमीनीचा प्रकार बघुनच योग्य पिकाची लागवड खताचे व पाण्याचे नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होउन शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे. कर्मयोगी शुकदास महाराजांचा शेती व शेतकरी हा अत्यंत जिव्हाळयाचा विषय होता. महाराजांनी गव्हाचे सुधारीत बियाणे, सिड बॅक,कमी पाण्यात येणा-या बियाण्यांची निवड पध्दतीने संशोधन करणे, दुर्मिळ वाणांचे जतन करणे, कृषि शिक्षणांची व्यवस्था करून कृषी पदवीधर तयार करणे व कृषी संबधी नानाविध उपक्रम राबवून परीसराच्या कृषी विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे.

मातीचा नमुना घेतांना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये. कंपोस्ट खत दिलेले असल्यास त्या भागातील माती नमुना घेवू नये. १५ ते ३० से.मी पर्यंत सोडून त्या खालील माती काढावी.
                                      डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय 

माती परिक्षणाचे फायदे
माती परीक्षणामुळे जमिनीतील  अन्नद्रव्याचे प्रमाण समजते. जमीन आम्लधर्मी किंवा विम्लधर्मी याची माहिती होवून  त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते.
माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करता येतो त्यामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढते. पिकांच्या वाढीस आवश्यक असणा-या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो.

असा घ्यावा मातीचा नमुना
मातीचा नमुना घेण्यासाठी प्रथम जमीनीवरील काडीकचरा बाजूला करावा.नमुना घेताना इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करावा. खड्डयाच्या एका बाजूची २ ते ३ सेंमी जाडीची माती खुरप्याच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरबडून घ्यावी. अशा प्रकारे मातीपरिक्षणासाठी मातीचा नमुना घ्यावा. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी.वाळलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा