जेवढा मोठा पुरूषार्थ तेवढा माणुस मोठा होतो,म्हणून लहानपणापासूनच यशाची स्वप्ने बघा. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम,चिकाटी व जिद्द ठेवा. जीवनातील नकारात्मक,कुसंस्काराचा त्याग करून एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी कटीबध्द रहा. उत्तुंग यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चित करा असे प्रतिपादन विवेकानंद कर्णबधिर महाविद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजीत आनंद साधना संस्कार शिबीरातील विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना सोमवारी (दि.२१) रोजी ते बोलत होते.
पुढे बोलतांना प्राचार्य शेळके म्हणाले की, बालपणापासून सत्यवचन,वडीधा-यांच्या आज्ञेनचे पालन करून सद्गुण व सदाचाराची कास धरा. ध्येय नसलेल्या व्यक्ती म्हणजे गलबत्याशिवाय जहाज म्हणून आयुष्यात आपली नजर केवळ आपल्या ध्येयावर ठेवून प्रयत्नवादी बना असेही ते पुढे बोलतांना म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत राजपूत तर आभार प्रदर्शन रवी लोखंडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा