Responsive Ads Here

रविवार, ३ जून, २०१८

अकोल्याच्या अपूर्वा पाध्येचे एमएचसीईटी परिक्षेतील अपूर्व यश!




जीत की खातिर बस जुनून चाहिऐ...जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिए...यह आसमान भी आएगा जमीन पर...बस इरोदा में जीत की गूँज चाहिए...आयुष्यात कुणालाच सहजासहजी यश मिळत नाही. यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम व ध्येयपूर्वीसाठी एकनिष्ठता तितकीच महत्वाची गोष्ट  आहे. आपल्या स्वप्नांना पत्यक्षात उतरविण्यासाठी परिश्रमाशिवाय अन्य मार्ग नाही. आयुष्याचे हेच गमक फारच थोडेजण ओळखतात आणि मग यशाच्या दिशेने त्यांची अथक वाटचाल सुरु होते. यशाच्या वाटेत येणा-या अनेक अडचणीची कुठलीही तमा न बाळगता अशा ध्येयवेड्या लोकांचा प्रवास सुरू होतो. यशाचे हेच गमक ओळखून अकोल्यातील अपूर्वा अशोक पाध्ये हिने लहानपणापासून अभियंता होण्याचे स्वप्न बघून  मनाचा निर्धार केला व त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत अपुर्वा अशोक पाध्ये हिने अभियांत्रिकी,औषध निर्माणशास्त्र व कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत २०० पैकी १८८ गुण संपादन करून मुलींमधून राज्यात दुसरे तर विदर्भातून प्रथम येण्याचा मान पटकावला. अपुर्वाच्या एमएचसीईटी परिक्षेतील यशामुळे तीचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे. अपुर्वाने एमएचसीईटी परिक्षेतील यशाचे स्वप्न सत्यात उतविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन,सातत्य,कठोर परिश्रमाची केल्यामुळेच तिला हे यश संपादन करता आले.
बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढची दिशा ठरविणारी परीक्षा म्हणून पाहिल्या जाणा-या एमएचटी सीईटी या महत्वपूर्ण पात्रता परीक्षेत विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये यांची कन्या अपुर्वा पाध्ये हिने २०० पैकी १८८ गुण मिळवत राज्यात मुलींमधून दुसरी तर विदर्भात प्रथम येण्याचा येणाचा मान पटकावला आहे.
अपुर्वाला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले तर फिजीक्स विषयात ४७ गुण तर केमिस्ट्र विषयात ४१ असे गुण मिळवून उत्तुंग भरारी मारली आहे. अपुर्वाला अन्य परिक्षांमध्ये JEE main AIR 2979, JEE paper 2 AIR 374, VITEEE AIR 340, BITSAT 300 असा स्कोअर असल्यामुळे देशातील नामवंत महाविद्यालयात तीचा प्रवेश निचित होणार आहे. अपुर्वाला अकोल्यातील आकाश एज्युकेशचे प्रा.मुकूंद पाध्ये व प्रा.आकाश पाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या यशाचे श्रेय या दोघांना व आपल्या आईवडीलांना देते. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींवर अपार श्रध्दा असलेले व विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यात सदैव तत्पर असलेल्या अशोक पाध्ये साहेबांच्या कन्येच्या एमएच सीईटी परिक्षेतील यशामुळे विवेकानंद आश्रम परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुर्वाच्या यशाने पुन्हा मुली मुलांपेक्षा कुठल्याच क्षेत्रात मागे नसल्याचे सिध्द केले आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
हिवरा आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा