विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती संवर्धनासाठी शिबीराची गरज - आत्मानंद थोरहाते


बालसंस्कार शिबीरामुळे मुलांच्या सुप्तकलागुणांना चालना मिळून त्यांचा व्यक्तीमत्व विकास होतो. संस्कार शिबीर ही आजच्या काळाची गरज आहे. भावी पिढी सुसंस्कृत होण्यासाठी बालसंस्कार शिबीर महत्वाची भूमिका बजावतात. संस्कृती संवर्धनासाठी बालसंस्कार शिबीराची गरज असल्याचे विचार आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी सोमवारी (दि.४) रोजी  केले.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या सेमीनार हॉल मध्ये आयोजीत आनंद साधना संस्कार शिबीराच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठचे प्राचार्य प्रा.मधुकर आढाव तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अशोक थोरहातेसचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,लव्हाळयाचे सरपंच दिनकर कंकाळ,हिवरा आश्रमच्या सरपंच सौ.निर्मला डाखोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली.
कुसंस्कारापासून मुलांच्या मनाचे आणि बुध्दीचे रक्षण व्हावे यासाठी सभोवतालचा परिसर संस्कारक्षम असावा लागतो. ज्या परिसरात पुण्यवंतांचा सहवास मुलांना लाभतो. तशी मुली जीवनात सद्गुणी बनतात. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज नावाचे सत्पुरूषाचा सहवास लाभलेली ही मुले निश्चित यशस्वी होतील. असे विचार पालक प्रतिनिधी म्हणून शे.ना.दळवी यांनी व्यक्त केले. या प्रकारच्या शिबीरांची सुरूवात १९६५ पासून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी  केली असून त्या काळात तरूणांकडून श्रमदानाने ग्रामविकास साध्य करता येतो हे आश्रमाने दाखवून दिले असे विचार जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष भिमराव शेळके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य अणाजी सिरसाट,कर्णबधिर विद्यालयाचे पी.वाय.शेळके,जेष्ठ शिक्षक भिमराव शेळके,मोनिका खत्री,डी.भास्कर,सज्जनसिंग राजपूत इत्यादी उपस्थित होते. यावेळी आनंद साधना या बालसंस्कार शिबीरात उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत राजपूत तर आभार प्रदर्शन रवि लोखंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांचे पालक,संस्थेचे कर्मचारी,गावातील प्रतिष्ठीत नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप प्रार्थनेने करण्यात आला. 

समारोप प्रसंगी शिबीरार्थी भावुक
दि.४ मे ते दि.४ जून असा ३० दिवसाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे रंजन करणा-यात्यांच्या कलागुणांना वाव देणा-यात्यांना निखळ आनंदी करून देणा-या उपक्रमांनीयुक्त अशा या आनंद साधना बालसंस्कार शिबीराचा समारोप होत असतांना विद्यार्थ्यांना भावना प्रधान करून गेले.


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
हिवरा आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा