Responsive Ads Here

मंगळवार, १२ जून, २०१८

उपहारगृहातील कामगाराच्या मुलाची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी

जिंदगी की असली उडान बाकी है... जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है...अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन हमने...अभी तो सारा आसमान बाकी है...वरील काव्य हे मनुष्याच्या जगण्याला केवळ उर्मीच देत नाही तर जीवनात यश मिळविण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडते. प्रतिकुल परीस्थितीशी दोन हात करण्याची हिॅमत देते. याचा प्रत्यय येतो हिवरा आश्रम येथील  अत्यंत प्रतिकूल परिस्थितील हिवरा आश्रम येथील सुमित संतोष लोळगे या विद्याथ्र्यांने दहावीच्या परिक्षेत ९४ टक्के गुण मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे. सुमित चे वडील संतोष लोळगे हे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद उपहार गृहात मजूरीचे काम करतात तर आई अनिता हया माहेवारी मुलांचे डब्बे करून आपल्या पतीला कौटुंबीक उदरनिर्वाहासाठी मदत करतात.

शिक्षण हे मानवाच्या विकास प्रक्रीयेतील महत्वपूर्ण बिंदू आहे. शिक्षणाने मानवी जीवन समृध्द होत नाही तर त्याला गती देण्याचे काम सुध्दा करते. शिक्षाणाने मानसाच्या वैचारीक विचार धारेतसुध्दा आमूलाग्र बदल होवून माणूस विवेकसंपन्न होण्यास मदत मिळते.  सुमितने घराच्या प्रतिकूल परिस्थीतीचे कुठल्याही प्रकारचे भांडवल न करता दुर्दम्य इच्छाशक्तीने दहावीच्या परिक्षेत ९४ टक्के गुण संपादन करून उत्तुंग भरारी घेतली. शिक्षणाच्या माध्यमातून आपले दिवस बदलू शकतात.शिक्षण हे अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाते..परंतु हे शिक्षण घेण्यासाठी माणसाची साधारण आर्थिक परिस्थिती कधीच अडथळा ठरू शकत नाही असंच काहीतरी त्या हॉटेल कामगाराच्या मुलाने या निमित्ताने सिद्ध करून दाखवलं आहे.
सुमितच्या घरीची परिस्थित अत्यंत जेमतेम आहे. वडील हे अडाणी असल्यामुळे घरी शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी कुणाचा आधार नाही. सुमितने अशा परिस्थितीत न डगमगता मोठया परिश्रमाने अभ्यास करून ९४ टक्के पर्यंत मजल मारली आहे. आई वडीलांनी सुमितच्या शैक्षणिक मार्गात आपली परिस्थीतची आडकाडी येवून नये म्हणून खूप कष्ट केले तर सुमितने सुध्दा आपल्या अभ्यासात कुठलीही कसून न ठेवता ९४ टक्के गुण मिळवून आईवडीलांचे स्वप्न साकार केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने यशाची स्वप्ने पाहावीत व ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमाची तयारी ठेवावी. मी सुरूवातीपासून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळेच दहावीच्या परिक्षेत यश मिळाले.
                                          सुमित संतोष लोळगे,विद्यार्थी हिवरा आश्रम

उच्च शिक्षण घेवून समाजसेवेचा मनोदय
सुमित हा विवेकानंद विद्या मंदिराचा विद्यार्थी असून तो अभ्यासु व होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याला लहानपणापासून वाचन व अभ्यासाची आवड आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेवून समाजसेवा करण्याचा त्याचा मनोदय आहे.
                                          आत्मानंद थोरहाते,सहसचिव विवेकानंद आश्रम



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा