Responsive Ads Here

मंगळवार, १२ जून, २०१८

दिपक दहावीच्या परिक्षेत चमकला !




हौसला कम न होगा तेरा तूफानों के सामने...मेहनत को इबादत में बदल कर तो देख...खुद ब खुद हल होंगी जिंदगी की मुश्किलें...बस खामोशी को सवालों में बदल कर तो देख...या कवीतेप्रमाणे आयुष्यातील खडतर प्रवासात सुध्दा आपले ध्येय व अथक परिश्रम  कायम ठेवीत दहावीच्या परीक्षेमध्ये दिपक भुंजगराव दिवठाणे या भूमीहीन व मोलमजूरी करणा-या आईच्या मुलाने इयत्ता दहावीच्या परिक्षेत कुठल्याही खाजगी शिकवणी वर्गाशिवाय ९६.२० टक्के गुण संपादन करून आपल्या स्वप्नांना कवेत घेतले आहे. भूमीहीन दिपकने आपल्या मिळवीलेल्या दहावीतीत उत्तुंग यशाच्या भरारीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव व त्याचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे. दिपक हा विवेकानंद विद्या मंदिराचा विद्यार्थी आहे. दिपकला दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण  मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. दिपकला ५०० गुणापैकी ४८१ गुण मिळाले आहे. दिपक भुजंगराव दिवठाणे हा मेहकर तालुक्यातील मादनी या गावचा असून त्याला सुरूवातीपासूनअभ्यासाची आवड आहे. लहान असतांनाच वडीलाचे हरविलेले छत्र... कुटुंबातील घरातील कर्ताच्या जाणाने दिवठाणे कुटूंबाची झालेली परवड...घरी कुठलीही स्थावर मालमत्ता नाही की मदतीचा हात पुढे करणार कुणी नाही... भूमीहीन आईला कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी दुस-याच्या शेतात मोलमजूरी करण्याशिवाय पर्याय नाही...शिक्षण घेण्यासाठी कुठलं ही आर्थीक पाठबळाचा नाही....मात्र दीपकला डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्याची लहानपणापासून इच्छा... दीपकने इयत्ता दहावीच्या परिक्षत ९६.२० टक्के गुण संपादन करून आपले एक पाउल आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकले आहे. ज्या शिक्षणामुळे मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते ते खरे शिक्षण... शिक्षण म्हणजे मानवी मूल्याची जोपासना करीत आदर्श जीवन जगण्याला मदत करणारी प्रणाली... प्रत्येक गोष्ट विवेकाच्या कसोटी तपासून पाहण्याची क्षमता विकसीत करण्याची कला म्हणजे शिक्षण... जे शिक्षण घेतल्याने माणसातील माणूसपण जागृत होते ते खरे शिक्षण.दिपक दिवठाणे या विद्याथ्र्याने दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून वेगळी ओळख निर्माण केली आह. दिपकच्या घरची परिस्थीत अत्यंत जेमतेम असून तो भूमीहिन आहे. आई दुस-याच्या शेतात मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते मात्र मुलाच्या उज्वल भविष्यासाठी तीने आपल्या कष्टात कुठेही कमी केली नाही. आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासात कुठेही परिस्थिती आड येऊ नये म्हणूतन शेतात मोल मजूरीचे काम करून दिपकच्या वहया,पुस्तके,कपडयांसाठी पैसे उभे केले. दिपकने सुध्दा आईच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. रात्रदिवस केवळ अभ्यासाचा ध्यास घेवून दहावी त्याला ९६.२० टक्के गुण मिळाले आहे. दिपकला कुठलीही खाजगी शिकवणी वर्गाशिवाय हे घवघवीत यश मिळाले आहे. दिपकला गणित विषयात १०० गुणापैकी १०० तर संस्कृत विषयात १०० गुण मिळाले आहे. अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम,चिकाटी हे आपल्या यशाचे गमक असल्याचे दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले.

विवेकानंद विद्या मंदिर विद्यार्थ्यांच्या यशाचा पथदर्शक
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींचे शिक्षणक्षेत्रावर विशेष लक्ष राहत असे. विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी तडजोड करू नका असा त्याचा कायम सल्ला असल्याकारणाने विवेकानंद विद्या मंदिराची उत्तुंग यशाची दीर्घ परंपरा पाहावयास मिळते. समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षण,अभ्यासास अनुकूल वातावरण,कडक शिस्त व शिक्षणासोबत संस्कार या सर्व बाबींमुळे विवेकानंद विद्या मंदिर शिक्षण घेणा-या विध्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा कायम उंचावलेला दिसून येतो. विवेकानंद विद्या मंदिर हा विद्यार्थ्यांच्या यशाचा खरा पथदर्शक आहे.
                            अणाजी सिरसाट,मुख्याध्यापक विवेकानंद विद्या मंदिर

प्रवेशासाठी दिला सल्ला 
मेहकरचे प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.प्रशांत दिवठाणे हे दरवर्षी मादणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या  गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कायम विविध स्पर्धांचे आयोजन करीत असतात  व त्यामधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवित असत. त्यांनी दिपकची अभ्यासातील गुणवत्ता ओळखून त्याला मार्गदर्शन केले व पुढील शिक्षणासाठी दीपकचा हिवरा आश्रमच्या विवेकानंद विद्या मंदिरात प्रवेश निश्चित केला.


आपले ध्येय निश्चित करा,अभ्यासाचे नियोजन,सातत्य,अथक परिश्रम व आत्मविश्वास या पंचतंत्रीचा वापर केल्यास आयुष्यात कुठलेही यश सहजप्राप्त करता येते. आईच्या कष्टाची जाणीव स्वस्थ बसू देत नसल्याने अथक परिश्रम करून यश प्राप्त केले.

                      दिपक भुजंगराव दिवठाणे,हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा