Responsive Ads Here

बुधवार, २७ जून, २०१८

यशासाठी स्व:ताची गुणवत्ता सिद्ध करा - संतोष गोरे



जीवन हे नेहमी संघर्षातून फुलत असते. यशाचा मार्ग हा नेहमी खडतर व कठीण असतो. आयुष्यात जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश. म्हणून आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करा, अभ्यासाचे नियोजन करा,चिकाटी व ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला हमखास यश मिळेल. यशासाठी स्वतःची गुणवत्ता सिध्द करा असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी (दि.२६) रोजी केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरातील शैक्षणिक सत्राच्या प्रथम दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक अणाजी सिरसाट,तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सहसचिव आत्मानंद थोरहाते तर प्रमुख उपस्थिती म्हणून  उपमुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक अशोक गि-हेआत्माराम जामकर तथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकांनी आपल्या पाल्याचे मूल्यमापन करू नये. विद्यार्थ्यांवर आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार विकासाची संधी द्यावी. कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील होतकरू,हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून विद्या मंदिर सुरू केले. शिक्षणासोबत सुसंस्कृत माणूस कसा निर्माण होईल यासाठी शिक्षणासोबत सुसंस्कार,शिस्त व चारित्र्याचे धडे या विद्या मंदिरात शिकवीले जातात. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग करावा विचार विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्याक आणाजी सिरसाट यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गि-हे तर सुत्रसंचालन सुजित दिवटे यांनी तर आभार प्रदर्शन आत्माराम जामकर यांनी मानले.

विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत
विवेकानंद विद्या मंदिरात प्रवेशोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह मोठया प्रमाणात दिसून आला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा