कष्टकरी भूमीपूत्राची उदयोगक्षेत्रात उत्तुंग भरारी !


हर सपने को अपने सांसो में रखों... हर मंजिल को अपने बाहो में रखों... हर जित आपकी है.. बस अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखों...या काव्याप्रमाणे कायम स्वप्नांचा पाठलाग करून त्यासाठी भूक,तहान हरवून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवितरपणे संघर्ष करण्याचे धैर्य फारच थोडया व्यक्तीजवळ असते. याचाच प्रत्यय विवेकानंद विद्या मंदिराचा माजी विद्यार्थी संदीप माणिकराव जाधव याच्या रूपाने दिसून येतो.  कुठल्याही प्रकारच्या उदयोग व्यवसायाची पार्श्वभूमी नसतांना केवळ जिद्द, चिकाटी व व्यवहारातील आव्हाने पेलण्याच्या बळावर संदीप जाधव याने पुणे येथे सोयाबीन पासून तयार होणा-या विविध खाद्य पदार्थ निर्मितीचा उदयोग यशस्वीपणे सुरू केला.
त्याचा हा  उद्योग कमी काळातच भरभराटीला आला. पाहता पाहता त्याच्या उत्पादनाने ग्राहकांच्या पसंतीला उतरले. स्वप्नांचा पाठलाग करण्याचे कसब व कौशल्य फारच थोडया लोकांना अवगत होते... आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास त्या ध्येयवेड्या लोकांना स्वस्थ बसू देत नाही... मग प्रवास सुरू होतो एका यशाची शिखरे एकटयाने पादाक्रांत करण्याचा...ह्रदयातील उर्मी,उर्जा व जिद्दीला कायम तेवत ठेवून अशी व्यक्ती  यशाच्या मार्गात येणा-या असंख्य अडचणी व संकटांचा सामाना करतात...आपल्यातील अतुलनीय बल व साहस याची अनुभूती व जाणीव होते. प्रत्येक ध्येयवेडयांची कदाचित स्वप्ने वेगवेगळी असतील मात्र ध्येयप्राप्तीसाठीची अभिलाषा मात्र एकच असते.
अशाच एका ध्येय वेडया नव उदयोन्मुख उदयोग सुरू करणा-या संदीप माणिकराव जाधव यांची...संदीप माणिकराव जाधव यांचे शालेय शिक्षण कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरात झाले. संदीप जाधव याने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथून  बी.एस.सी.अ‍ॅग्री चे शिक्षण घेतले आहे. मुळातच जिद्दी,चिकाटी व परिश्रमाची तयारी ठेणा-या संदीपने आपल्या कृषी शिक्षणाच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यासाठी करण्याचे ठरविले... खरतर मार्केटिंग  क्षेत्रातील अग्रगण्य आय.टी.सी. या कंपनीत १०  वर्ष काम केले. त्यामुळे साहाजिक लोकांची मानसिकता,आवड,उत्पादनाचे वितरणाचे हे कसब त्याने शिकले. 
खरतर मराठी माणूस हा स्पर्धेत टिकू शकत नाही. स्पर्धेतील आव्हाने पेलण्याची क्षमता नसल्यामुळे लवकरच तो कुठल्याही व्यवसायात  अपयशी होते हे त्याला मान्य नसल्यामुळे आपण एक नवीन उदयोग सुरू करून तो नावरूपाला आणावा असा ठाम निर्णय केला.


कुठलाही व्यवसायाचा प्रारंभ करतांना स्वतःवर ठाम विश्वास ठेवा. आपण करीत असलेले काम जिद्दीने कायम सुरु ठेवा. आयुष्यात परिश्रमाशिवाय यश प्राप्त होत नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी आपली गुवत्तावाढीवर लक्ष केंद्रीत करा.

                                                                                       संदीप माणिकराव जाधव, उदयोजक

सोयाबीन पासून विविध पदार्थाची निर्मिती 
संदीप माणिकराव जाधव याने पुणे येथे सोयाबीन पासून निर्मित सोया दुध,सोया मँगो मिल्क,सोया कॉफी मिल्क,सोया चॉकलेट मिल्क,सोया पनीर,सोया बिस्कीट,सोया कुकीज,सोया आईस्क्रीम,सोया आटा,सोया सॉस अशी विविध उत्पादने निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्याचा हा  उद्योग अल्प काळातच भरभराटीला आला असून संदीप ग्रामीण भागातील युवकांसाठी यशस्वी उदयोजक बनला आहे.

सोयाबीन आरोग्यासाठी वरदान
सोयाबीनमध्ये मोठया प्रमाणात प्रोटीनची मात्र असते. सोयाबीनमध्ये प्रोटीन शिवाय व्हिटॅमिनखनिज आणि बी कॉम्प्लेक्स आहे. सोयाबीन दुध आरोग्यासाठी वरदान आहे. सोयाबीन दुधा मध्ये अंडे,मांस आणि मासेपेक्षा अधिक प्रमाणात प्रोटीन असते. सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. शरीराला सोयाबीनपासून अनेक फायदे होतात. आहारामध्ये नियमित  सोयाबीनचा वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो महिलांना ओस्टियोपोरोसिसपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे रेसायन फायदेशीर ठरते.

असे आहे सोयाबीनचे फायदे
ज्या व्यक्तीना मानसिक आजार आहे अशा व्यक्तींनी नियमीतपणे सोयाबीनचे सेवन केल्यास मानसिक आजारावर नियंत्रण मिळविता येते. ज्या व्यक्ती ह्रदयरोगापासून त्रस्त आहे अशा व्यक्तीनी सोयाबीन व त्यापासून बनविलेले पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास हदयाचा धोका दूर होतो. याशिवाय उच्च रक्तदाबावरही सोयाबीन फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाब असणा-या व्यक्तीसाठी सोयाबीन रामबाण औषधी युक्त आहार आहे. तसेच सोयाबीनपासून लेसीथिन मिळते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते. याशिवाय सोयाबीनपासून बनवलेले ताक प्यायल्याने पोटांचे विकार कमी होतात.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा