शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून येथूनच जवळ असलेल्या जिल्हा परिषद कळंबेश्वर या शाळेचे सर्व वर्ग डिजीटल क्लासरूममध्येबदलेले आहेत. जिल्हा परिषद कळंबेश्वर मराठी प्राथमिक शाळा डिजीटल झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हसत खेळत शिक्षण घेणे सोपे झालेआहे. कळंबेश्वर येथील जि.प.शाळेच्या सर्ववर्ग खोल्या ग्रामपंचातीच्या आर्थिक साहय्याने डिजीटल झाल्या आहेत. कंळबेश्वर येथील डिजीटल क्लासरूमचे उदघाटन दि. १२ जून रोजी करण्यात आले. यामध्ये २ संच संगणक, ३ एलईडी संच,प्रोजक्टर,आर.ओ मशिन,विविध खेळांचे साहित्य,कपाट सात नग याचा समावेश आहे.
या डिजीटल क्लासरूम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विष्णु मगर हे होते तर उदघाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण अवचार,उपाध्यक्ष दिपक मिसाळ,तंटामुक्तीअध्यक्ष पुंजाजी बो-हाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख संजय लामधाडे, विभाग प्रमुख सदीप गायकवाड,ग्रा.पं.सदस्य डॉ. देविदास बो-हाडे, गणेश कांबळे, चिनकीराम सपकाळ, लक्ष्मण अवचार, विठ्ठल चांगाडे, भास्कर निकम, महावीर अंभोरे, कडुबा नाटेकर, अमोल भराड, नारायण कापसे, शाळा समिती सदस्य समाधान निकम,गोपाळ साखळकर,गजानन चांगाडे,ओंकार शेवलकर, विनोदभाकडे,गणेश भराड,अजित अंभोरे,जानकीराम बोरकर,आशीष मगर,भागवत गायकवाड,केशव पोपळघाट,हरिभाउ काळे,अरविंद अवचार, तथा आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लामधाडे यांनी तर सुत्रसंचालन चांदणे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसारी,महाकाळ अवचार,कदममॅडम,भागवत मॅडम यांनी परिश्रम घेतले.
शाळेचा झाला कायापालट
कळंबेश्वर येथील ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळा डिजीटल केली आहे. ग्रामपंचायत डिजीटल प्रणालीचे साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले आहे. या डिजीटल प्रणालीसाहित्यासमध्ये तीन एईडी, संगणकाचे संच यांचा समावेश आहे.
डिजीटल शाळेमुळे विद्यार्थी हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण घेत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना प्रोजक्टर व्दारे शिकविल्या जात असल्याने असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत सुद्धा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा