Responsive Ads Here

सोमवार, २९ एप्रिल, २०१९

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहभेटीने फुलणार विवेकानंद आश्रम


ग्रामीण भागातील होतकरू, हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना  शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रम या छोट्या शाखेड्यात  १९८२ मध्ये विवेकानंद विद्या मंदिर सुरू केले. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असलेला तरुण निर्मितीसाठी विवेकानंद विद्या मंदिराने कटाक्षाने लक्ष दिले.  १९८२ ते २०१८ पर्यंत जे माजी विद्यार्थी याशैक्षणिक संकुलात शिकून गेलेत, त्यांचा गेट टू गेदर चा मित्रमेळा हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय विवेकानंद आश्रमाने घेतला आहे. विवेकानंद आश्रमात ९ जून २०१९ रोजी  विवेकानंद आश्रमात  सर्व माजी  विद्यार्थ्यांचा मेळा भरणार आहे.
विवेकानंद आश्रमाच्या वसतिगृहातील  विद्यार्थ्यांची दिनचर्या म्हणजे भावी आदर्श व्यक्तिमत्वाचा परिपाकच होय. विवेकानंद विद्या मंदिरातून शिक्षण घेणा-या  विद्यार्थ्यांना सदाचार,नीतीमूल्य,चारित्र्यसंपन्न,कर्तव्यदक्षता सोबत व्यावहारीक जीवनाचे धडेशिकविले जातात. कर्मयोगी प. पू. शुकदास महाराजश्री यांनी हिवरा आश्रम या खेड्या गावाच्या माळरानावर स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रमाने राज्यसह जगभरात ओळख निर्माण केली आहे. १९८२ ते २०१८ या वर्षातील इयत्ता दहावी, इयत्ताबारावीची बॅच असलेल्या माजी  विद्यार्थ्यांचा हा गेट टू गेदर कार्यक्रम विवेकानंद आश्रमात दिनांक ९जून२०१९ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.  विवेकानंद आश्रमात आलेल्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांसोबत सेल्फी फोटो,ग्रुप फोटो काढण्यासाठी सेल्फी पार्इंट सुध्दा राहणार आहे.

३६ वर्षानंतर होणार मित्रांच्या भेटीगाठी
शोध आणि बोध म्हणजे शिक्षण ही कर्मयोगी संत शुकदास महाराजांची शिक्षणाची अत्यंत साध्या सरळ सोप्या शब्दात केलेली व्याख्या. मुलांना शिकवितांना ते कळेपर्यंत शिकवा हा महाराजश्रींचा आग्रह असे.विवेकानंद आश्रमाच्या विद्या मंदिरात शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना विवेकानंद आश्रमची झालेली प्रगती माहिती व्हावी,जुन्या मित्रांना पुन्हा भेटा यावे यासाठी गेट टू गेदरसाठी विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला आहे,
 
माजी विद्यार्थी कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर
गेल्या ३६ वर्षांत विवेकानंद शैक्षणिक संकुलात शिकलेले विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यांवर आणि विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. राजकारण, समाजकारण, वैद्यकीय, सेवा, सहकार, पत्रकारिता, संरक्षण या सर्वच क्षेत्रांत या  विद्यार्थ्यांनी आपले नावकमावलेले असून आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक अग्रेसर आहेत.

बरेच विद्यार्थी प्रदीर्घ काळापासून विवेकानंद आश्रमातही आलेले नाहीत. त्यामुळे या सर्व  विद्यार्थ्यांना विवेकानंद आश्रमात पाचारण करून त्यांना विवेकानंद आश्रमाची झालेली प्रगती, भविष्यातील नियोजन आणि प. पू. शुकदास महाराजश्रींच्यासंकल्पाच्या पूर्ततेसाठी हवे असलेले त्यांचे सहकार्य याबाबत अवगत करून देण्यासाठी हे गेट टू गेदर ठेवण्यात आलेले आहे. विविध क्षेत्रात काम करर्णाया या माजी  विद्यार्थ्यांचा परिचयही एकमेकांना करून दिला जाणार आहे.                                                                       संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा