Responsive Ads Here

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

श्रीराम कथेतून कर्तव्य परायणतेचा संदेश- रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज


श्रीराम कथा श्रवणाने जगण्याला उर्मी,उर्जा   दिशा मिळते. श्रीराम कथा आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. जीवनातील सर्व समस्यांच्या उत्तरासाठी श्रीराम कथा आहे. समाजातील विवेक नाहिसा होत असून अविवेकी झालेल्या वर्ग सज्जनांसाठी त्रास दायक ठरतो. रामायणाच्या  कथेच्या श्रवणाने विवेकाधिष्ठीत वृत्तीची वाढ होते विवेकी समाजाची निर्मिती होते.  रामायण वाचणारा ऐकणारा मनुष्य कर्तव्यापासून दूर जात नाही. श्रीराम कथेतून कर्तव्य परायणतेचा संदेश मिळतो असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी श्रीराम कथेच्या व्दितीय पुष्प प्रसंगी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळया निमीत्त आयोजित श्रीराम कथेच्या व्दितीय दिवशीय कथेच्या प्रसंगी ते शुक्रवारी ता.१२ रोजी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ढोक महाराज म्हणाले की,रामायण जगाच्या कल्याणासाठी आहे. पतीसोबत वनवास पत्कारणारी राजकन्या असणारी सीता सर्वसुखांचा त्याग करून पतीवर आलेल्या प्रसंगात साथ करते एकपत्नी हे व्रत स्वीकारलेले प्रभू रामचंद्र शेवटपर्यंत एकपत्नीत्वाचाच स्वीकार करतात. सर्व सांसारीक जीवांसाठी प्रभू रामचंद्र सीतामाई जगातील आदर्श पती पत्नी आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
विवेकानंद आश्रमात गेल्या चार दिवसापासून  कर्मयोगी .पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याने परिसरात चैतन्य पसरले आहे. आज शनिवार ता. १३ रोजी या सोहळ्याची भाविकांना महाप्रसाद वितरणाने सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली. रामायणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेने या सोहळ्याला पूर्णत्व प्राप्त झाले होते. तर १३ एप्रिल रोजी हभप. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होईल. तसेच सायंकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान वेदांताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री महाराज यांचे प्रवचन त्यानंतर स्वामी विवेकानंद जीवनचरित्राच्या अभ्यासिका डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांचेही व्याख्यान पार पडणार आहे.

शुकदास महाराज समाधी सोहळयाची सांगता
विवेकानंद आश्रमात गेल्या चार दिवसापासून  कर्मयोगी .पूशुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याने परिसरात चैतन्य पसरले आहेआज शनिवार ता१३ रोजी या सोहळ्याची भाविकांना महाप्रसाद वितरणाने सांगता होणार आहेया सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली

विवाह मुर्हूताला प्राधान्य द्या
यावेळी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी बोलतांना  सांगीतले की,आजकाल विवाह मध्ये विवाह मुर्हूत  केवळ लग्नपत्रिकेसाठी पुरता राहिला आहे. विवाह सोहळयामध्ये मुर्हूला विशेष महत्व आहे. वर पिता वधू पित्यांनी विवाह मुर्हूला प्राधान्य द्यावे देवून विवाह मुर्हूताच्या समयीच विवाह पार पाडावा.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा