विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांच्यात निवडणूकीचे महत्व बिंबवावे,मतदानाच्या अधिकाराबाबत त्यांच्यात जनजागृती व्हावी या उद्देशाने विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणा-या विवेकानंद विद्या मंदिर,विवेकानंद कृषी महाविद्यालय,विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी मतदान जागृतीसाठी हिवरा आश्रम गावामध्ये मतदान जागृती रॅलीचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना मतदानाचे महत्व घोषवाक्य देवून मतदानाचे आवाहन करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने प्रत्येक गावातील पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहभागातून विविध दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार मंगळवार ता.२ रोजी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,मुख्याप्राचार्य कैलास भिसडे,उपमुख्याध्यापक अशोक गि-हे, प्रा.गजानन ठाकरे, प्रा.मंगेश जकाते, प्रा.रवींद्र काकड, प्रा.पवन थोरहाते, प्रा.समाधान जाधव, प्रा.मनोज खोडके, प्रा.जयप्रकाश सोळंकी, प्रा.ज्ञानेश्वर गाडे, प्रा. विठल ताठर, गोविंद अवचार, श्याम खरात,पत्रकार संतोष थोरहाते तथा शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
मतदान जागृतीसाठी घोषवाक्य
छोडकर सारे काम! चलो करो मतदान!, लोकशाही आहे आधार कोणतेही मत घालू नका बेकार,सर्वांची आहे जबाबदारी मत देणार सर्वनर नारी,निर्भय होऊन मतदान करा देशाचा सन्मान करा,सोडा सारे काम धाम,मतदान करणे पहिले काम, चला मतदान कररू या देशाची प्रग घडवू या,मतदान करा,साक्षर जनता मतदान टाळत नाही,बोटावरील शाई लोकशाहीला पुढे नेई,मतदान कशासाठी उज्वल भविष्यासाठी,जागृत मतदार लोकशाहीचा आधार अशा विविध मतदान जागृतीसाठी घोषवाक्य विद्यार्थ्यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा