रामकथेत संकटात धैर्याने सामोरे जाण्याची ताकद - रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक


मनुष्याला नरदेह हा महत्व भाग्याने मिळालेला आहे. वाणीतील मृदता आणि आचारणातील शुध्दताने माणसाचा आध्यात्मीक विकास होतो. सदाचार हा जीवनाचा खरा अलंकार आहे. जीवनाची खरी सार्थकता ही परोपकारवृत्ती सामावली आहे. मनुष्याने धर्माचरणासोबत सदाचाराचे आचरण करावे. सदाचार जीवनाचा खरा राजमार्ग आहे. रामकथेत संकटात धैर्याने सामोरे जाण्याची ताकद असल्याचे  प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी शनिवार ता. १३ रोजी भाविकांना बोलतांना केले. जीवंत देवाचे उपासक,सव्वा कोटीहून अधिक रूग्णांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे कर्मयोगीसंत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधी सोळया निमित्त आयोजित संगीत श्रीराम कथेच्या तृतीय पुष्पाच्याप्रसंगी ते भाविकांशी बोलत होते.

कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळयाची सांगता हजारो भाविकांना  महाप्रसाद वितरण करून शनिवारी ता. १३ रोजी करण्यात आली. प.पू.शुकदास महाराज यांच्या समाधी सोहळयानिमित्त तब्बल २० हजारोपक्षा जास्त भाविकांनी २५ क्विंटल गहू पुरी व वांगे भाजीचा महाप्रसादाचा लाभ घेतला. मुंबई येथील उद्योगपती तथा आश्रमाचे माजी विश्वस्त एकनाथराव दुधे,विश्वस्त तथा उदयोग प्रशांत हजारी या मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक, हभप आसाराम महाराज भारती, हभप गजाननदादाशास्त्री यांनी महाप्रसादाचे पूजन केले. तीन दिवस कार्यक्रमाचे सूत्र ह.भ.प. गजाननदादा शास्त्री  महाराज यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आश्रमाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकर्ते, हितचिंतक, सर्व  शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य , शिक्षक व कर्मचारी  तथा परिसरातील गावक-यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते.



राज्याच्या कानकोप-यातून हजारो भाविकांची उपस्थिती
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाराच्या प्रसार प्रचाराचे कार्य ग्रामीण भागात केले. जीवंत देवाची पूजा हीच ईश्वर सेवा होय. आपल्या रुग्णसेवेतून सव्वा कोटीहून अधिक रुग्णांना  व्याधी मुक्त केले. कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक भक्त विवेकानंद आश्रमात गेल्या तीन दिवसापासून हजर होते.

भाविकांनी घेतला महाप्रसाद
कर्मयोगी संत . पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळयाची सांगता हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण करून शनिवारी ता.१३ रोजी करण्यात आली. प.पू.शुकदास महाराज यांच्या समाधी सोहळयानिमित्त तब्बल २० हजारोपक्षा जास्त भाविकांनी २५ क्विंटल गहू पुरी व वांगे भाजीचा महाप्रसादाचा लाभ घेतला.

समाधी सोहळा ठरतोय प्रमुख उत्सव
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांचा तीन दिवशीय जन्मोत्सव सोहळा संर्पूण भारतात केवळ हिवरा आश्रम येथेच साजरा केला जातो. तसा पायंडा सोडसहा दशकापूर्वी .पू.शुकदास महाराज यांनी या परिसरात पाडला आहे.  हा जन्मोत्सव सातासमुद्रापार पोहोचला असतांना आता .पू.शुकदास महाराजांचा समाधी सोहळाही व्यापक रूप धारण करीत असून यानिमित्त राज्यभरातून भाविकांची पावले विवेकानंदनगरीकडे वळू लागली आहे. त्यामुळे विवेकानंद जन्मोत्सवानंतर .पू.शुकदास महाराजांचा समाधी सोहळा विवेकानंद नगरीतील प्रमुख उत्सव ठरत आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा