तरूणाने ठिबक सिंचनाद्वारे फुलविली टरबूज शेती

दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस वाढत आहेदुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून विक्रमी उत्पन्न घेण्याची किमया ग्रामीणभागातील प्रयोगशील शेतकरी करीत आहेतयाचाच प्रत्यय येथून जवळ असलेल्या दुधा येथील सुशिक्षीत तरूण शरद रमेशराव देशमुख यांच्या रूपाने दिसून येतोशरद देशमुख यांनी सागर किंग जातीच्या टरबूज पिकाची चार एकरात लागवड केलीत्यांनी ठिबक  सिंचनाच्या मदतीने चार एकरात ८० टन टरबूजाचे उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकरी बांधवांसमोर त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहेत्यांनी टरबूज पिकावर आपले लक्ष केंद्रित करून दोन वर्षापासून भरघोस उत्पन्न घेत आर्थिक प्रगती साधली आहे.
शरद देशमुख यांनी पारंपारीक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत ठिबक सिंचनातून फुलविलेल्या टरबूज शेतीमुळे त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
शदर देशमुख २०  जानेवारी रोजी केलेल्या लागवडीतून आज ७० दिवसाला त्यांना ४ एकरांमध्ये ८० टन टरबूजाचे उत्पन्न झाले. सद्या टरबूजाची तोडणी सुरू त्यांच्या शेतातील टरबूजाला मेहकर,चिखली,बुलडाणा,वाशिम,रिसोड,जाफ्राबाद येथील व्यापा-याकडून मोठया प्रमाणात खरेदी होत आहे.  टरबूजाला प्रतिकिलो  ८ ते ९ रूपये भाव मिळत आहे. त्यांना टरबूज शेतीतून सहा  ते साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळाले. सुरूवातील शेताची नागरणी केली. त्यात शेणखताचा वापर केला. गादी वाफे करून सहा बाय दीड फुटावर बियांची टोचणी केली. रोगराईच्या नियंत्रणासाठी मच्लिंग पेपरचा वापर केला. पहिल्या महिन्यात दोनदा फवारणी केली तर एका महिन्यानंतर आठ दिवसातून दोनदा फवारणी केली. ठिबक सिंचनाव्दारे वॉटर सोल्युबल खत आठ दिवसातून दोनदा टरबूज पिकाला दिले. ठिबक सिंचनाव्दारे खत दिल्यामुळे टरबूजाचे फळ सशक्त तयार होण्यास मदत मिळाली.

चार एकरात  ८० टन टरबूजाचे उत्पन्न
शरद देशमुख यांनी सागर किंग जातीच्या टरबूज पिकाची चार एकरात लागवड केली. शदर देशमुख २०  जानेवारी रोजी केलेल्या लागवडीतून आज ७० दिवसाला त्यांना  एकरांमध्ये ८० टन टरबूजाचे उत्पन्न झाले.

चार जिल्हयात टरबूजाला मागणी
सद्या टरबूजाची तोडणी सुरू त्यांच्या शेतातील टरबूजाला मेहकर, चिखली, बुलडाणा, वाशिम, रिसोड, जाफ्राबाद येथील व्यापा-याकडून मोठया प्रमाणात खरेदी होत आहे. 

सकाळ भूमीपुत्राची यशोगाथाने दिली प्रेरणा
दैनिक सकाळ मधून प्रकाशीत होणा-या भूमीपुत्राची यशोगाथा वाचण्यात आली. आपण  सुध्दा शेतीत नवतंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पन्न घेवून आर्थिक उन्नती करू शकतो हा आत्मविश्वास जागृत झाला.त्याप्रेरणेतून टरबूज शेतीकडे वळलो.

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून निसर्गाच्या लहरीपणाचा शेतीक्षेत्राला मोठया प्रमाणात फटका बसत आहेम्हणून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.ठिबक सिंचनामुळे दुष्काळी परिस्थीतीमध्ये सुध्दा भरघोस उत्पन्न मिळू शकले.
                                       शरद रमेशराव देशमुख टरबूज शेतकरी दुधा


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा